‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगलंच धुमाकूळ घातला आहे. सिनेमाचा विषय, कथानक या सर्वच घटकांमुळे हा सिनेमा विशेषतः चर्चेत आहे. सर्वच स्तरातून या चित्रपटावर वेगवेगळं भाष्य केलं जात, काही लोक या चित्रपटाला घेऊन चांगली प्रतिक्रिया देत आहेत तर काहींनी या चित्रपट पाहू नका असा नारा लगावला आहे. अशी सर्व परिस्थिती असली तरी चित्रपटाचा टिझर पाहूनच प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. (Kedar Shinde Post)
दिग्दर्शक सुदीप्तो सेनचा हा सिनेमा रिलीज झाला असून पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा न दाखवण्यात यावा यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी भाष्य केलं आहे. दरम्यान अनेक नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवत सिनेमा फुकट दाखवत असल्याचा आरोप एका नावाजलेल्या मराठी दिग्दर्शकाने केला आहे.
पहा काय म्हणाले केदार शिंदे (Kedar Shinde Post)
आतापर्यंत या सिनेमाला घेऊन सिनेविश्वातल्या अनेक कलाकार मंडळींनी आणि दिग्दर्शकांनी बरंच भाष्य केलं आहे. दरम्यान महाराष्ट्रातील या चित्रपटाची सध्याची स्थिती पाहता दिग्दर्शक केदार शिंदे यानीही ट्विट करत भाष्य केलं आहे. याआधी केदार शिंदे आणि कंगना रनौत यांनी या चित्रपटाला घेऊन भाष्य केलं होत. दरम्यान आता केदार शिंदे यांनी देखील या चित्रपटाला घेऊन भाष्य केलं आहे. नुकताच केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, दरम्यान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवा तसा गल्ला जमवलेला नाही. अंकुश चौधरी आणि सना केदार शिंदे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.(Kedar Shinde Post)
हे देखील वाचा – ‘ती बाई चप्पल घेऊन मारायला आली’प्रसादने सांगितला तो किस्सा
मनातील भावना व्यक्त करत केदार यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ‘दुर्दैव… महाराष्ट्रात ‘केरला स्टोरी’ या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित झाला हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण हे तरी माहिती असेल का?’ अशी खरमरीत पोस्ट त्यांनी व्यक्त केली आहे.