काही कलाकार हे त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. प्रेक्षकही त्यांच्यावर अतोनात प्रेम करत असतात. नायक म्हणून या कलाकारांवर चाहते भरभरून प्रेम करतात मात्र ज्यावेळी हे नायक खलनायकी भूमिकेत दिसतात तेव्हा मात्र चाहते नाराज दिसतात. (Prasad Oak Incidence)
काही चाहत्यांना असं वाटत की अमुक कलाकाराने फक्त नायकच पडद्यावर उभा करावा, अर्थात यमाचे चाहत्यांचं प्रेम असत. बरेचदा ते चाहत्यांच्या कृतींमधून कलाकारापर्यटन पोहोचत, आणि कलाकाराला या चाहत्यांच्या प्रेमालाचा अप्लाय कामाची पोचपावती समजतात.
पहा काय म्हणाले प्रसाद ओक (Prasad Oak Incidence)
असाच एक किस्सा अभिनेता प्रसाद ओक याने its majja ला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितला आहे. itss majja च्या रॅपिड फायर या सेगमेंट मध्ये प्रसादला जेव्हा आतापर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती असा प्रश्न विचारला असता, प्रसाद यावर म्हणाला, २०१० साली रणांगण या नाटकाच्या प्रयोगानंतर एक बाई थेट मला चप्पल घेऊन मारायला आली. त्या नाटकामध्ये मी खलनायकाच्या भूमिकेत होतो. नाटकाच्या प्रयोगानंतर माझी भूमिका पाहून ती थेट मला मारायला आली. आणि हीच मला मिळालेली सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट आहे असं मला वाटतंय.(Prasad Oak Incidence)
हे देखील वाचा – ‘मी क्लीन कॅरेक्टरचा माणूस आहे’ महेश यांनी अश्विनी भावेला दिल उत्तर
रणांगण नाटकावेळी नाटक संपल्यानंतर प्रसादला मिळालेली कॉम्प्लिमेंट ही बेस्ट कॉम्प्लिमेंट होती. एक अभिनेता म्हणून प्रसाद उत्तम आहेच, शिवाय तो बेस्ट डिरेक्टर देखील आहे. आजवर प्रसादने साकारलेल्या सगळ्याच भूमिका विशेष गाजल्या आहेत. अभिनेता म्हणून आज त्याचा चाहतावर्ग ही बराच मोठा आहे.