‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते कधी चित्रपटांबद्दल तर कधी इंटस्ट्रीतील लोकांबाबत स्वतःचं मत मांडताना दिसतात. दरम्यान विवेक यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकतंच त्यांनी निर्माता करण जोहर व अभिनेता शाहरुख खान यांच्यावरही संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा विवेक यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी कलाकरांवर टीका केली आहे. त्यांनी बॉलिवूडमधील कलाकरांचा मुर्ख म्हणून उल्लेख केला.(Vivek Agnihotri Resigned From Bollywood)
विवेक यांनी या अगोदर ‘चॉकलेट’, ‘धन धना धन गोल’ व ‘हेट स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. त्यानंतर गेल्या काही वर्षात त्यांनी जगाला आरसा दाखवणारे असे चित्रपट बनवले. ज्यामध्ये ‘ताश्तंद फाइल्स’ व ‘द कश्मीर फाइल्स’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी भारतीय सिनेमाला मुर्ख म्हटलं आहे. बॉलिवूडचे कलाकार दिग्दर्शक व लेखकांना मुर्ख बनवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे या लोकांबरोबर काम करणं शक्य नसल्याचं विवेक यांनी म्हटलं आहे. त्यांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेत असल्याचं घोषित केलं आहे.
वाचा – विवेक बॉलिवूड कलाकरांबद्दल काय म्हणाले?(Vivek Agnihotri Resigned From Bollywood)
पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, “बॉलिवूडचे अभिनेते सुशिक्षित नाहीत. त्यांना जगाविषयी अजिबात माहिती नाही. कारण मी ज्या कलाकारांबरोबर काम केलं आहेत त्यांचं स्वतःचं कोणतंही अस्तित्व नाही. मी खरं बोलतोय हे मी अहंकारात बोलत नाही. मला असं वाटतं की, मी ज्यांच्याबरोबर काम केलं ते अजिबात सुशिक्षित नाहीत. त्यांना जगाबाबत जराही समज नाही. मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे. माझ्याकडे जगाला बघण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे”.
आणखी वाचा – काजोलच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, ऑफिससाठी घेतली इतकी महागडी जागा
पुढे ते म्हणाले, “चित्रपट माझ्यामुळे कधीच ओळखला जात नाही. चित्रपटातील मुर्ख अभिनेत्यांमुळे तो ओळखला जातो. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या बॉलिवूडमधून राजीनामा घेत आहे”. विवेक आता यापुढे कोणताच बॉलिवूड चित्रपट करणार नसल्याचं यामधून स्पष्ट झालं आहे.