शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’चा पुढचा भाग येणार ! दिग्दर्शकाने केली घोषणा

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 19, 2023 | 7:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kashmir files director declared its next part of flim

kashmir files director declared its next part of flim

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित व तितकाच वादग्रस्त ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा गेल्यावर्षी देशभरात रिलीज झाला. अवघ्या कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई करत कोरोनानंतर अशी कामगिरी करणारा पहिला हिंदी सिनेमा ठरला. या सिनेमाची बरीच चर्चा रंगली, अनेक वाद झाले, पण काहींनी या सिनेमाचे कौतुक केले होते. (the kashmir files)

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले असून आता सिनेमाच्या दिग्दर्शकांनी ट्विटरवर सिनेमाच्या पुढचा भाग येणार असल्याची घोषणा केली. ‘काश्मीर अनरिपोर्टेड’ असे याचे नाव असून तो डॉक्युमेंट्रीच्या रूपात ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहे. त्याचा टीझरही रिलीज झाला असून ज्यामध्ये खऱ्या पीडितांना आलेल्या अनुभवाचे कथन केले जाणार आहे. ही डॉक्युमेंट्री ‘काश्मिर फाईल्स’ची फॉलोअप स्टोरी असल्याचे सांगितले जात आहे.

पहा या डॉक्युमेंट्रीची एक छोटीशी झलक (kashmir files unreported)

PRESENTING:

A lot of Genocide Deniers, terror supporters & enemies of Bharat questioned The Kashmir Files. Now bringing to you the VULGAR truth of Kashmir Genocide of Hindus which only a devil can question.

Coming soon #KashmirUNREPORTED. Be ready to cry.

Only on @ZEE5India… pic.twitter.com/DgGlnzSKwA

— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 19, 2023

या सिनेमाची घोषणा करताना ज्यांनी या सिनेमावर टीका-टिप्पणी केली, त्यांनी या डॉक्युमेंट्रीतून काही बोध घेण्याचे ट्विट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं आहे. ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

विवेक अग्निहोत्री यांचा हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. शिवाय तेवढ्याच प्रमाणात वादही झाला होता. सिनेमात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर, त्यांना करावा लागलेला संघर्ष आणि त्यांच्या वाटेला आलेला अपमान याविषयीचे विदारक चित्रण करण्यात आले असून आता या डॉक्युमेंट्रीचे टीझर समोर आल्यानंतर प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहे. (kashmir files unreported)

Tags: bollywoodkashmir files unreportedthe kashmiri filesvivek agnihotri
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sai tamhankar memory about duniyadari

'दुनियादारी' चित्रपटात वापरलेली 'ही' गोष्ट सई आजही वापरते

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.