टिकटिक वाजते डोक्यात ही टिकटिक आजही त्याच अंदाजात प्रेक्षकांच्या डोक्यात वाजते आहे. एका पेक्षा एक कमाल डायलॉग, एव्हरग्रीन गाणी ज्या चित्रपटाने दिली तो बहारदार चित्रपट म्हणजे दुनियादारी.मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज असणारा असा हा चित्रपट. प्रेक्षकांचे सर्व लाडके कलाकार या चित्रपटनिमित्त एकत्र बघण्याचा योग आला. (sai tamhankar memory about duniyadari)
चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं.परंतु अभिनेत्री सई ताम्हणकरच्या शिरीन या भूमिकेला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. चित्रपटातील सईचा लुक ही अगदी लक्षवेधी होता. तिच्या अभिनयातील सहजता यामुळे कायमच सईने प्रेक्षकांचा मन जिंकलं आहे.
पाहा काय आहे ‘ती’ खास गोष्ट? (sai tamhankar memory about duniyadari)
दुनियादारी या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त सईने लाल रंगाच्या ड्रेसवरच रेट्रो लूक मधील फोटोशूट केलं आहे.तिच्या या लूकला विशेष पसंती मिळते आहे. तिच्या या संपूर्ण लूकमध्ये एक गोष्ट खास आहे .ते म्हणजे सईने घातलेले इअररिंग्स. सईने या फोटोजच्या कॅप्शन मध्ये म्हंटल आहे, की १० वर्षांपूर्वी तसेच इअररिंग्स तिने चित्रपटात देखील घातले होते. सईच्या या लूकमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा शिरीनची आठवण झाली. (sai tamhankar memory about duniyadari)
सई तिच्या कामातून प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडण्यात आजवर यशस्वी ठरली आहे.दशकपूर्ती निमित्त पुन्हा एकदा आज दुनियादारी चित्रपटाची प्रेक्षकांना आवर्जून आठवण झाली.ते गाणी ते डायलॉग आणि ते कलाकार १० वर्षांपूर्वीचा तो माहोल पुन्हा एकदा अनुभवता आला. अशा एव्हरग्रीन कलाकृतींचा आपण भाग आहोत ही गोष्ट प्रत्येक कलाकारासाठी खूप खास असते.
हे देखील वाचा : ‘दुनियादारी’ रिलीज झाल्यानंतर ‘तो’ फोन आला आणि ढसाढसा रडलो