झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काऊच. पूर्वी अभिनेत्री त्यांच्याबरोबर घडणाऱ्या प्रसंगाचा खुलासा करत नव्हत्या. पण आता अभिनेत्री पुढे येतात आणि त्यांच्याबरोबर घडलेल्या घटना सांगतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, निर्माते यांच्या ऑफरला नकार देत चित्रपटात काम करणं टाळलं आहे. या घटनेचा काही अभिनेत्रींच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उपासना सिंह. काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलच्या मावशीची भूमिका साकारून सगळ्यांना हसवणाऱ्या उपासना सिंहने तिच्या कास्टिंग काउचचा बळी होण्यापासून स्वतःला कसे वाचवले? याबद्दल सांगितले आहे. (upasana singh casting couch experience)
याबद्दल उपासना सिंह म्हणाली की, “एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने मला अनिल कपूरबरोबर चित्रपटासाठी साइन केले होते. मी जेव्हा कधी दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जायचे तेव्हा माझ्या आईला किंवा बहिणीला बरोबर घेऊन जायचे. एके दिवशी त्याने मला विचारले की, मी नेहमीच कोणालातरी बरोबर का आणते? त्याने रात्री ११.३० वाजता मला फोन करुन हॉटेलमध्ये बसण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मी चित्रपटाची कथा ऐकणार असा हट्ट धरला, तिथे पोहोचण्यासाठी माझ्याकडे गाडी नव्हती. तेव्हा तो असं म्हणाला की, तुला बसण्याचा अर्थ कळला नाही?”
बॉलीवूड बबलच्या वृत्तानुसार उपासना म्हणाली की, “मग मात्र मला राग आला. त्यांचे ऑफिस वांद्रा इथे होते, मी दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेली. त्यावेळी ते तिथे तीन-चार जणांबरोबर बसले होते. त्याच्या सचिवाने मला थांबायला सांगितले, पण मी सरळ आत गेली. लोकांसमोर पाच मिनिटे पंजाबी भाषेत मी त्याला शिवीगाळ केली. पण तिथल्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर मला आठवतंय की, मी अनिल कपूरबरोबर चित्रपट साईन केल्याचे अनेकांना सांगितले होते. फुटपाथवरून चालताना माझे अश्रू थांबत नव्हते”.
आणखी वाचा – ‘बालवीर’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, नुकताच पार पडला साखपुडा, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक
यापुढे बोलताना उपासनाने सांगितलं की, “या घटनेनंतर मी सात दिवस माझ्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. मी सारखी रडत राहिली. मी लोकांना काय सांगू असा प्रश्न पडला. पण त्या सात दिवसांनी मला बळ आले. त्यावेळी आईने मला खूप साथ दिली. मी माझ्या आईबद्दल विचार केला आणि ठरवले की मी चित्रपटसृष्टी कधीही सोडणार नाही”.