Neena Kulkarni Post : नीना कुळकर्णी यांनी फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नीना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट, मालिका केल्या, ज्यातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. याशिवाय नीना यांनी नाटकांमध्ये काम करत रंगभूमीही गाजवली. खूप वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय, वेगवेगळे कंगोरे असणाऱ्या भूमिका साकारत त्यांनी अनेक भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनात रुजवल्या. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नीना कुळकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप लोकांना माहीत नाही.
सोशल मीडियावर नीना बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात असतात. ‘थोड़ा है थोड़े की जरूरत है’, ‘ये हैं मोहब्बते’ या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. तर ‘ध्यानीमनी’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘छापा-काटा’, ‘वाडा चिरेबंदी’ या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नीना या नेहमीच त्यांच्या परखड व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असतात.

अशातच नीना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये नीना यांनी त्यांच्या नातीबरोबरचा सुंदर असा फोटो पोस्ट केला आहे. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून त्या वेळात वेळ काढून नातीबरोबर, कुटुंबाबरोबर क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. “माझ्या तीन आठवड्यांच्या नातवाला माझ्या हातात धरणं हा मी अनुभवलेल्या सर्वात मोठ्या आनंदांपैकी एक आहे. ती पूर्णपणे मोहक, गोड आणि निरागस आहे. रोहन आणि रिया यांचे पालक झाल्याबद्दल अभिनंदन”, असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – ‘त्या’ रात्री नॅनी ठरली सैफ अली खानची देवदूत, अभिनेता घरी येताच संपूर्ण घराला रोषणाई, कपूर कुटुंबिय आनंदात
नीना कुळकर्णी यांच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाले तर त्यांचे पती दिलीप कुळकर्णी हे लोकप्रिय अभिनेते होते. दिलीप कुळकर्णी यांचा ‘चौकट राजा’ चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. त्यांनी ‘सर्वसाक्षी’, ‘विनायक’,’आई’ या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं. दिलीप कुळकर्णी याचं २००२ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीची साथ सुटल्यानंतर त्या खचल्या नाहीत आणि आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी काम करत राहिल्या. नीना यांच्या मुलीचे नाव सोहा व मुलाचे नाव दिविज आहे.