बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा रुग्णालयातून दुसऱ्या घरी पोहचला आहे. तो तंदुरुस्त असल्याचे कालच्या दृश्यातून समोर आले आहे. १६ जानेवारी भल्या पहाटे घरात घुसून त्याच्यावर हल्लेखोराने सहा वार केले होते. त्यानंतर चार दिवस आरोपीला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली होती. जीवघेण्या हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला २१ जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिनेता घरी परतताच त्याच्या सुरक्षिततेसाठी नवीन सुरक्षा टीम नियुक्त करण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफला आता अभिनेता रोनित रॉयच्या सिक्युरिटी एजन्सीकडून संरक्षण मिळणार आहे. (ronit roy agency provide security to saif ali khan)
सैफ अली खानच्या घरातील फॉर्च्यून हाईट्सचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी अनेक व्हिडीओमध्ये अभिनेता रोनित रॉय सैफच्या घराची पाहणी करताना दिसत आहे. तसंच तो सुरक्षा अधिकाऱ्यांशीही बोलताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीची टीम सैफ अली खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देणार असल्याचे म्हटलं जात आहे. अर्थात याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रोनित रॉय जवळपास २५ वर्षांपासून सुरक्षा एजन्सी चालवत आहेत. त्याच्या एजन्सीचे नाव AceSqad Security LLP आहे.
आणखी वाचा – ‘बालवीर’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, नुकताच पार पडला साखपुडा, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक
रिपोर्टनुसार, सैफपूर्वी रोनित रॉयने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर आणि कतरिना कैफ यांसारख्या स्टार्सनाही सुरक्षा पुरवली होती. १६ जानेवारीच्या रात्री सुमारे २ वाजता शहजाद नावाचा व्यक्ती सैफ अली खानच्या घरात घुसला होता. हा व्यक्ती वांद्रे येथील अभिनेत्याच्या अपार्टमेंटमध्ये चोरीच्या उद्देशाने घुसला होता. मात्र त्यानंतर त्याचा सामना सैफ अली खानबरोबर झाला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेत अभिनेत्याच्या मानेवर आणि पाठीवर खोल जखमा झाल्या होत्या.
दरम्यान, या हल्ल्यानंतर सैफ अली खानला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफ हॉस्पिटलमधून त्याच्या फॉर्च्युन हाइट्स येथील जुन्या घरात शिफ्ट झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मीडिया आणि पापाराझींची प्रचंड गर्दी पाहून पोलिसांनी त्याच्या घराभोवती बॅरिकेड्स लावले आहेत