सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नॉमिनेशनमध्ये ‘पॉवर की’चा खेळ, पहिल्याच आठवड्यात ‘हे’ ९ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट, ‘त्या’ ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 15, 2026 | 9:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6 Nomination Task

'हे' ९ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

Bigg Boss Marathi 6 Nomination Task : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमधील पहिलं नॉमिनेशन कार्य नुकतंच पार पडलं असून, यावेळी बिग बॉसने दिलेल्या मोठ्या ट्विस्टमुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. ‘पतंग’ या संकल्पनेवर आधारित या टास्कमध्ये कोणाचा पतंग कोण कापणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वीच ग्रँड प्रीमियरला शॉर्टकट दरवाजा निवडलेल्या सदस्यांना देण्यात आलेल्या ‘पॉवर की’चा प्रभाव दिसून आला. पॉवर की असलेल्या सदस्यांना बिग बॉसने पॉवर चेंबरमध्ये जोडीने बोलावून महत्त्वाचे निर्णय घ्यायला लावले. सोनाली–रुचिता, करण–प्राजक्ता आणि दिपाली–तन्वी अशा जोड्यांमधून टास्क पार पडला.

या टास्कमध्ये करणने रुचिताला तिची पॉवर की परत देण्यास नकार दिल्यामुळे रुचिता थेट घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाली. दिपाली आणि तन्वी यांच्यातील टास्कमध्ये पहिला बझर तन्वीने वाजवल्याने ती कॅप्टन पदाची उमेदवार ठरली, तर दिपाली नॉमिनेशनमध्ये गेली. रुचिता बाद झाल्यामुळे सोनालीलाही कॅप्टन पदाच्या शर्यतीत थेट संधी मिळाली. दुसरीकडे, प्राजक्ता आणि करण यांच्यातील निर्णयात प्राजक्ता कॅप्टन पदाची दावेदार ठरली, तर करण घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाला.

आणखी वाचा – “माझा गळा का दाबतोय…” पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान राडा, विशाल–ओमकारमध्ये हाणामारी; वादाने घरात गोंधळ

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यानंतर उर्वरित सदस्यांसाठी ‘पतंग टास्क’ खेळवण्यात आला. या टास्कमध्ये कॅप्टन पदाच्या दावेदार असलेल्या तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता यांना प्रत्येकी दोन सदस्य नॉमिनेट करण्याचा अधिकार देण्यात आला. या निर्णयांनुसार सागर, दिव्या, रोशन, राधा, प्रभू आणि अनुश्री हे सदस्य नॉमिनेशनमध्ये गेले. यासोबतच आधीच नॉमिनेट झालेले दिपाली, करण आणि रुचिता यांचा समावेश झाल्याने पहिल्याच आठवड्यात एकूण नऊ सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत आले आहेत. यामुळे ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठी उलथापालथ झाली आहे…. आता या नऊ जणांपैकी नेमकं कोण घराबाहेर जाणार?, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून आली आहे.

आणखी वाचा – “लोक पैसे मागायला यायचे तेव्हा…”; ‘बिग बॉस’च्या घरात करणने सांगितलं भावुक प्रसंग, म्हणाला, “पैशाने आनंद विकत घेता येतो…”

Tags: Bigg Boss Marathi 6 Nomination Taskentertainmentmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 : दीपाली-तन्वीमध्ये जोरदार भांडण, एकमेकांची उणीधुणी काढली अन्…; वाद पेटणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.