मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 6 : दीपाली-तन्वीमध्ये जोरदार भांडण, एकमेकांची उणीधुणी काढली अन्…; वाद पेटणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 15, 2026 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6 : दीपाली-तन्वीमध्ये जोरदार भांडण, एकमेकांची उणीधुणी काढली अन्…; वाद पेटणार

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनमध्ये स्पर्धकांमध्ये फूट पडायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आता दीपाली सय्यद आणि तन्वी यांच्यामध्ये ही भांडण झाल्याचं दिसून आलं. या वादादरम्यान दोघीही एकमेकांना बरं वाईट बोलताना दिसत आहेत. त्यांच्या या भांडणानंतर तर दीपाली सय्यद ढसाढसा रडताना दिसली. तन्वी ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून भांडण करताना दिसत आहे. आता शुल्लक कारणावरुन पुन्हा एकदा तन्वीने दीपालीसह वाद घातला आहे.

यापूर्वीही तन्वीने सागर कारंडेसारख्या मोठ्या अभिनेत्याचा अपमान केला होता. वयाचा विचार न करता तन्वी तोंडाला येईल ते बोलते. आता पुन्हा एकदा तिने दीपालीसह वाद घातला आहे. दीपालीच्या मदतीला ती धावून आली पण त्याचाही तिने बोलबाला केला. यावर दीपालीनेही तन्वीला सुनावलं. यावेळी घरातील इतर सदस्यही तिथे येतात. दीपाली राकेश बापटला म्हणते, “मी जिथे चांगली असते ना तिथे चांगली असते. तुमचं मत आहे ना ते तुम्ही मांडा”. यावर तन्वी दीपालीला म्हणते, “मी फक्त आले”. त्यावर दीपाली म्हणते, “अगं पण तू का आलीस?, तुला कोणी बोलावलं”. यावर तन्वी म्हणते, “मला माहित नव्हतं तू इतका तमाशा करशील?, तुला वाकड्यात जायचंय तर वाकड्यातच जा”.

आणखी वाचा – नॉमिनेशनमध्ये ‘पॉवर की’चा खेळ, पहिल्याच आठवड्यात ‘हे’ ९ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट, ‘त्या’ ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

त्यानंतर दीपाली ढसाढसा रडते आणि रुचिताला म्हणते, “मला काहीच प्रूव्ह करायचं नाही आहे मी काय आहे आणि काय नाही आहे ते. मी मान देते, मी मोठ्यांना मान देते, आदर देते, अरे मोठ्यांना वाईट वाटत नाही का?”, असं म्हणत रडताना दिसते. आता तन्वी आणि दीपालीमधील हा वाद किती मोठी पेट घेणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 6dipali sayyad
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Shashank Ketkar video

"ज्या शाळेत मतदान केले…", मतदानानंतर शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, "कोणत्याही पार्टीतील निवडून आलं तरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.