‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सध्या ओटीटीवरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व सुरु होणार आहे. १८ जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची झलक पहायाल मिळाली आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र यामध्ये सहभागी होणाऱ्या एका सदस्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर प्रोमो व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘वडापाव गर्ल’ची झलक पाहायला मिळाली. यावरुन आता प्रेक्षकांची प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. (vadapav girl in big boss ott)
ओटीटीवर येणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली ‘वडापाव गर्ल’ म्हणजेच चंद्रिका दीक्षित दिसून येत आहे. चंद्रिकाने नोकरी सोडून वडापावची गाडी सुरु केली आणि वडापावची विक्री सुरु केली. एका फूड ब्लॉगरने चंद्रिकाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामूले ती रातोरात सोशल मीडिया स्टार झाली. मात्र ती वडापावपेक्षा तिच्या स्वभावामुळे अधिक चर्चेत आली. तिचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. आशातच आता ती एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. मात्र ‘बिग बॉस’मधील तिच्या एंट्रीने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Spice, drama and entertainment… sab milega when our first contestant enters the Bigg Boss house 😌
— JioCinema (@JioCinema) June 19, 2024
Can you guess who this #TeekhiMirchi is? 💁♀️🔥#BiggBossOTT3 streaming exclusively on JioCinema Premium starting 21 June, 9 pm#BBOTT3onJioCinema #BBOTT3 #BiggBoss… pic.twitter.com/y6ZYYFFdnC
चंद्रिका याआधी एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होती. नंतर ती खूप आजारी पडली आणि त्यामध्येच तिने नोकरीदेखील सोडली. त्यानंतर तिने स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिने दिल्लीमध्येच वडापावची गाडी सुरु केली. तिच्या वडापावच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेलीदेखील पहायला मिळाली. तसेच तिच्या बोलण्याच्या पद्धतीमुळेही तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता या नावाजलेल्या कार्यक्रमात तिला घेतल्याने लोक आता निर्मात्यांवर नाराज असल्याचे पाहायला मिळाले.
प्रोमो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की , “काहीही करा आणि प्रसिद्धी मिळवा”, तसेच एकाने लिहिले आहे की, “खरचं ! ती या योग्यतेची आहे का” त्यामुळे आता तिच्या एंट्रीने पुढे काय होणार हे आता पाहाण्यासारखे आहे.