टीव्ही इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन झाले आहे. आशा शर्मा यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) ने अभिनेत्रीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे आणि CINTAA ने देखील अभिनेत्रीच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. आशा शर्मा यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली आहे. आशा यांनी लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटातही काम केले होते. त्यांच्या निधनाच्या बतमीनंतर टीव्ही जगताबरोबर चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त केला आहे. (Asha Sharma passed away)
आशा शर्मा एक वर्षाहून अधिक काळ अंथरुणाला खिळल्या होत्या. अभिनेत्री टीना घईने मीडियाशी बोलताना सांगितले की, “गेल्या वर्षी त्यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या चार वेळा घसरल्या होत्या. गेल्या एप्रिलपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. अशा परिस्थितीत त्या स्टेजवरही काम करायला तयार होत्या. आशा शर्मा यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे होते. प्रकृती नीट नसूनही त्यांचा जोश व उत्साह कायम होता”.
‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनाही आशा शर्मा यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. ते म्हणाले, ‘हे अत्यंत दुर्दैवी आहे. ती किती छान अभिनेत्री आणि व्यक्ती होती. हे ऐकून खूप वाईट वाटले. उल्लेखनीय आहे की, आशाने ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात माता शबरीची भूमिका साकारली होती”. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सेनन माता जानकीच्या भूमिकेत दिसली होती.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’मधील इरिनाचा प्रवास संपला, घराबाहेर जाताना वैभव भावुक
‘नुक्कड’, ‘बुनियाद’ सारख्या मालिकांशिवाय आशा यांनी ‘महाभारत’ (१९९७) आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकांमधूनही लोकप्रियता मिळवली. ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘हमको तुमसे प्यार है’ आणि ‘१९२०’ सारख्या चित्रपटांमध्येही त्या दिसल्या होती. दिवंगत अभिनेत्रीने धर्मेंद्र व हेमा मालिनी यांच्यासह ‘दो दिशां’ या चित्रपटातही काम केले होते.