Bigg Boss Marathi 5 : हिंदी सिनेसृष्टीसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात रितेश देशमुख यशस्वी ठरला. दोन्ही चित्रपट सृष्टीमध्ये काम करत रितेशने स्वतःची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. सध्या रितेश ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ च्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळताना दिसतोय. यापूर्वी ‘बिग बॉस’च्या चार सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेते महेश मांजरेकर यांनी साकारली होती. मात्र रितेशला सीजन ५ च्या होस्टिंगची जबाबदारी साकारताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. महेश मांजरेकर जी भूमिका साकारत होते ती भूमिका रितेश पार पाडू शकेल का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
दरम्यान पहिल्या दोन भाऊच्या धक्क्यावर रितेशने घेतलेली स्पर्धकांची छाया अनेकांना खटकली. यावरुन अनेकांनी रितेश व महेश मांजरेकर यांची तुलना देखील केली. मात्र तिसऱ्या व चौथ्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने या ट्रोलिंगला न जुमानता सडेतोड उत्तर दिलेल पाहायला मिळालं. स्पर्धकांची चांगलीच शाळा घेत त्यांना शिक्षा सुनावली. स्पर्धकांची त्याने चांगलीच कान उघडणी केलेली पाहायला मिळाली. रितेशने कठोर शब्दात झापलं पाहिजे असं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं असताना रितेशने चौथ्या भाऊच्या धक्क्यावर घेतलेली शाळा पाहून अनेकांना आनंद झाला.
आणखी वाचा – “तुम्ही म्हाताऱ्या झालात”, विचित्र मॅसेज करणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “आपली लायकी काय…”
रितेशच्या या होस्टिंगवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीने केलेला भाष्य चर्चेत आलं आहे. निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव, घनःश्याम या सगळ्यांची त्याने शाळा घेतली. कठोर शब्दात टीम एचा पर्दाफाश केला तर जान्हवीला तिची शिक्षा म्हणून जेलमध्येही टाकलं. इतकंच नव्हे तर घनःश्यामला यापुढे माझ्याशी बोलायचं नाही अशी धमकी सुद्धा दिली. हा सगळा अपमान कितीही ठरवलं तरी तितक्या कठोर शब्दात करता येत नाही, हा स्वभावच गोड आहे असं म्हणत मराठमोळा अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारेने पोस्ट शेअर करत मत मांडलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’मधील इरिनाचा प्रवास संपला, घराबाहेर जाताना वैभव भावुक
पल्लवीने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “काही माणसं जन्मालाच इतकी गोड येतात की, त्यांना ठरवून अभिनय म्हणून सुद्धा कुणाचा अपमान करता येत नाही. सगळे रितेश देशमुखवर चिडत आहेत की, त्याला या लोकांशी घालून पाडून, रागात, त्यांची लायकी काढून बोलता येत नाही. पण कुणाला हेच कळत नाही आहे की, त्या माणसावर कुठल्या लेव्हलचे संस्कार आहेत. तो ठरवून पण असं बोलू शकत नाही. यात रितेशची चूक नाही. एक अभिनेता म्हणून तो पूर्ण जीव ओतून त्याचं काम करण्याचा प्रामणिक प्रयत्न करत आहे. पण, त्याच्या डोळ्यात त्याच्यातला एक गोड माणूस इतका ताबा घेऊन असतो की, आपल्याला अपेक्षित असलेली नजर त्यात दिसत नाही. हे माझ मतं आहे लोकांना कदाचित आवडणार नाही त्याबद्दल क्षमस्व”. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सहमती दर्शविली आहे.