रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टेलिव्हिजनचे कलाकार झळकणार मोठ्या पडद्यावर, मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी जोडी, हास्यजत्रेतील ही अभिनेत्री आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 2, 2026 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
lagnacha shot movie

टेलिव्हिजनचे कलाकार झळकणार मोठ्या पडद्यावर, मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी जोडी, हास्यजत्रेतील ही अभिनेत्री आणि…

lagnacha shot movie : टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले चेहरे म्हणजे अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर. दोघांनीही आपल्या अभिनयाची छाप अवघ्या महाराष्ट्रावर सोडली आहे. हेच चेहरे आता पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. अक्षय गोरे दिग्दर्शित ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटातून ते एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रियदर्शिनी हिने यापूर्वी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नामांकित कलाकारांसोबत काम केले आहे, मात्र या चित्रपटात ती पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्यासोबत झळकणार आहे. या दोघांच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला एक फ्रेश जोडी मिळणार आहे.

प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, “अशा प्रकारचा रोमँटिक चित्रपट मी पहिल्यांदाच करतेय. या चित्रपटात आमचं एक रोमॅंटिक गाणंही आहे, जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पडद्यावर अशा पद्धतीचा रोमान्स मी पहिल्यांदाच साकारत आहे. अभिजीतसोबत काम करताना मला खूपच सहजता वाटली. तो अत्यंत शिस्तबद्ध असून चित्रीकरणाच्या ठिकाणी सगळं अतिशय संयमानं हाताळतो. सहकलाकाराची काळजी घेण्यापासून ते चित्रीकरणावेळी काय योग्य आहे आणि काय टाळावं, याबाबत तो काटेकोर आहे. चित्रपटासाठी एकत्र काम करण्यापूर्वी आमची ओळख नव्हती, मात्र या निमित्ताने अभिजीतशी छान ओळख निर्माण झाली. मी स्वतः तालमींवर भर देणारी कलाकार असल्यामुळे अनेकदा ‘एकदा पुन्हा सीन करुया’ असं सुचवायचे आणि त्याने त्यासाठी नेहमीच मनापासून साथ दिली. त्यामुळे संपूर्ण चित्रीकरणादरम्यान एक सुरक्षित आणि सहज वातावरण तयार झालं. एकंदरच अभिजीतसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय समाधानकारक आणि संस्मरणीय ठरला”.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; हक्काचं घर घेत दिली आनंदाची बातमी, म्हणाली…

अभिजीत आमकर म्हणाला, “माझा अभिनयाचा प्रवास रंगभूमीपासून सुरु झाला आणि आज मी विविध माध्यमांतून काम करत आहे. या सगळ्या प्रवासात प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आता माझा हा चित्रपट प्रदर्शित होत असताना एक वेगळाच आनंद आणि समाधान वाटत आहे. पडदा लहान असो वा मोठा, मेहनत मात्र तितकीच असते आणि त्याच प्रामाणिकपणे मी या चित्रपटासाठीही काम केलं आहे. आतापर्यंत मिळालेलं प्रेम या चित्रपटातूनही मिळेल, अशी मनापासून आशा आहे. प्रियदर्शिनीसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. ती कामाबाबत अत्यंत एकाग्र आहे आणि तिची स्वतःची एक वेगळी शैली आहे. या चित्रपटात आमची ओळख नसलेल्या दोन व्यक्तींची गोष्ट असल्यामुळे आमच्यातली ही केमिस्ट्री महत्त्वाची होती आणि ती छान जमली. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करताना एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली”.

आणखी वाचा – “आई मला मुलाऐवजी सूनेसारखी वागवायची”, गोविंदाचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “भांडी घासायला आणि…”

महापर्व फिल्म्स आणि जिजा फिल्म कंपनी प्रस्तुत‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत, संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. तर अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: lagnacha shotmarathi actormarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu Serial Off Air

मालिकाविश्व गाजवलेल्या अभिनेत्रीच्या नव्या मालिकेचा आठ महिन्यांतच निरोप, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.