सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; हक्काचं घर घेत दिली आनंदाची बातमी, म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 2, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari New Home

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात

Jui Gadkari New Home: २०२५ निरोप दिल्यानंतर अनेक कलाकारांनी २०२६ या नवीन वर्षात अनेक नवनवीन गोष्टींचा श्रीगणेशा केला. अनेकांनी नव्या प्रोजेक्टसची घोषणा केली. तर अनेकांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांसोबत खास गोष्टी शेअर केल्या. अशातच अभिनेत्री जुई गडकरीने देखील एका आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ही मालिका टीआरपीच्यामध्ये देखील अव्वल स्थानावर असते. मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या मालिकेत सायलीचे भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची लाडकी आहे. तिच्या भूमिकेचं नेहमी कौतुक देखील होताना दिसतं.

आणखी वाचा: अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांचे निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर, ‘या’ अभिनेत्रीने दिली साथ

अशातच अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जुई गडकरीने स्वतःच नवीन घर खरेदी केलं आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. जुईचं कर्जत मूळ घर आहे. मात्र आता तिने स्वतःच दुसरं घर खरेदी केलं आहे. पुण्यात तिने स्वतःच दुसरं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या नवीन घराची झलक दाखवली आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ‘नवीन सुरुवात, घर, पुणे…’ असं कॅप्शन दिलं आहे. या स्टोरीमध्ये तिच्या हातात नवीन घराची किल्ली पाहायला मिळत आहे. तर सध्या कलाविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Jui Gadkari New Home)

जुईचं कर्जतमध्ये ९० वर्षे जुनं पारंपरिक घर आहे. दरम्यान ती कामानिमित्त ठाण्यात राहत असली तरी जुई वरचेवर कर्जतच्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. तर आता जुई तिच्या नवीन घराची संपूर्ण झलक कधी दाखवणार याबद्दल तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायलीची भूमिका साकारत असून अनेक नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. (Jui Gadkari New Home)

आणखी वाचा: “आपण खचलो तर…”, आई कुठे… फेम अभिनेत्रीने अर्चना पाटकर यांच्यासाठी शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “ती नकळत आपल्यावर…”

Tags: jui gadkariJui Gadkari New Homemarathi actresstharal tar mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
lagnacha shot movie

टेलिव्हिजनचे कलाकार झळकणार मोठ्या पडद्यावर, मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी जोडी, हास्यजत्रेतील ही अभिनेत्री आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.