Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे प्रियाने प्रतिमाला जीवे मारण्याचा डाव आखलेला असतो. प्रिया प्रतिमा झोपली असताना रात्री उशीरा तिचं नाक दाबून मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रतिमा स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत असते. त्याच वेळेला प्रतिमाचा हात पाण्याच्या जगला लागतो आणि ते भांडे खाली पडतं. त्या आवाजांना तिथं नागराज येतो. तेव्हा प्रिया सारवासारव करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रतिमा आरडाओरडा करत म्हणते की, मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत होतं. माझ्या नाकावर उशी ठेवली होती आणि मला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. तेव्हा नागराज सांगतो की, असं काहीच झालं नसेल. काल तुम्ही आर्टिस्टला सांगत होतात म्हणून कदाचित तुम्ही या धक्क्यातून बाहेर आला नसाल, असं म्हणत सारवासारव करतो.
त्यांचं हे बोलणं ऐकून प्रतिमा सुद्धा काहीच बोलत नाही. त्यानंतर इकडे प्रिया नागराज हे साक्षी व महीपतकडे जातात आणि त्यांच्याकडे जाऊन प्रतिमाला जीवे मारण्याबद्दल बोलत असतात. तेव्हा साक्षी सांगते की, आता कोणाचा खून करणं बरं नाही आधीच आपण फसलो आहोत. तेव्हा प्रिया सांगते की, तू जो आधी खून केला आहेस त्या प्रकरणातूनच आपण सुटलो नाहीये. तेव्हा साक्षी सांगते, हो विलास खून प्रकरणातूनच दोन वर्ष झाली अजून आपण बाहेर पडलो नाही आहोत आणि आता परत कोणाचा खून करणं मला पटत नाहीये.
त्यानंतर महिपत सांगतो की, मी या सगळ्यात पडलो तर तुम्हाला महागात पडेल. तेव्हा प्रिया आणि नागराज दोघेही शांत होतात. तर दुसऱ्या दिवशी पूर्णा आजी घरातल्या सगळ्यांना सांगते की, उद्याचा दिवस काही करुन दणक्यात साजरा केला पाहिजे. उद्या अर्जुन सायलीचा वाढदिवस आहे तेवढ्यात प्रताप सांगतो की, चैतन्य आणि अश्विन्न यांनी तयारी सुद्धा सुरु केली आहे. एवढ्यातच दरवाज्यात कल्पना येते. कल्पनाला पाहून सगळेच खूप आनंदी होतात. तेव्हा प्रताप सांगतो की, मी तुला घ्यायला येणारच होतो. तू एकटीच कशाला आली. यावर कल्पना सांगते मलाच राहवलं नाही आणि उद्याचा दिवसासाठी मी खास इथं आले आहे.
हे ऐकून सगळेच खुश होतात. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीतून खाली येतात आणि कल्पनाला पाहून ते खूप आनंदी होतात. ते धावत कल्पना जवळ येतात आणि कल्पनाला घट्ट अशी मिठी मारतात. आता अर्जुन सायलीचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार का हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.