दाक्षिणात्य सुपरस्टारच्या नागार्जुन यांचा थोरला लेक म्हणजेच अभिनेता नागा चैतन्यने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ज्या क्षणाची चाहते मंडळी गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. हे लग्न हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं. नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे पहिले फोटोही समोर आले आहेत आणि हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Naga Chaitanya and Shobhita Dhulipala got Married)
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी ४ डिसेंबर रोजी रात्री हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये एका खाजगी समारंभात लग्नगाठ बांधली आहे. यावेळी संपूर्ण अक्किनेनी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते. चाहत्यांनी आणि सिनेइंडस्ट्रीतील मंडळींनी या जोडप्यावर आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
चैतन्य आणि शोभिता यांनी लग्नसोहळ्यात खास पारंपारिक लुक केला होता. हिंदू रितीरिवाजांनुसार अभिनेत्याने त्याच्या लग्नासाठी ऑफ-व्हाइट धोती आणि कुर्ता परिधान केला होता. तर शोभिता सोनेरी कांजीवरम साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये फारच सुंदर दिसली. शोभिताच्या चेहऱ्यावरचे हास्य दाखवते की ती तिच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल तीकिती उत्साही आहे.
दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची साखरपुडा झाला होता. एका खाजगी समारंभात झालेल्या या या सोहळ्यात दोघांचेही कुटुंब सहभागी झाले होते. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी लग्नाचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासून चैतन्य आणि शोभिता कधी लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती.
अशातच काल ४ डिसेंबरला लग्नाच्या विधींना सुरुवात झाल्यानंतर आता चैतन्य आणि शोभिता यांनी चाहत्यांना त्यांच्या लग्नसोहळ्याची झलक दाखवली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोखाली त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांना शुभेच्छा देत आहेत