Tharla Tar Mag Serial Update : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेच्या कथानकाने आणि मालिकेतील कलाकारांनी ‘ठरलं तर मग’ला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मालिकेतील सायली व अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सायली व अर्जुनभोवती फिरणार कथानक साऱ्यांच्या पसंतीस पडतंय. अशातच मालिकेत सध्या एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, सायली व अर्जुनच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुभेदार कुटुंबाकडून सुरु आहे. सायली व अर्जुन यांना कोणतीच माहिती न देता त्यांनी हा सेलिब्रेशनचा प्लॅन आखला आहे.
मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सकाळी, पूर्णा आजी प्रतापला सांगते उद्याचा दिवस दणक्यात साजरा झाला पाहिजे. त्यावर प्रताप म्हणतो, मी चैतन्य आणि अश्विनने उद्याची तयारी सुरू पण केलीये. तेवढ्यात कल्पनासुद्धा येते. सगळे तिला पाहून आनंदी होतात. मी तुला स्वतः घ्यायला आलो असतो, असं प्रताप कल्पनाला म्हणतो. नागराज, महीपत, प्रिया आणि साक्षी प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करत असतात. उद्याच्या दिवसासाठी मी आले निघून, असं कल्पना म्हणते.
कल्पना, कुसुमला पण त्यांच्याच घरी थांबायला सांगते. चैतन्य सायली-अर्जुनच्या वाढदिवसाच्या प्लॅनिंगचं बोलतो. तेवढ्यात अर्जुन-सायली खोलीतून येतात. दोघंही कल्पनाला मिठी मारतात.अर्जुन, चैतन्यला बाहेर घेऊन जातो. पूर्णा आजी कुसुमला सायलीला वर खोलीत घेऊन जायला सांगते. तरी सायली जायला तयार होत नाही. अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सुभेदार कुटुंब सायली व अर्जुनचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – बाबा सिद्दीकीआधी सलमान खानला मारायचं होतं पण…; शूटरने स्वत:च केला खुलासा, सांगितला संपूर्ण प्लॅन
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सायली व अर्जुन यांच्या वाढदिवसानिमित्त केकची व्यवस्था केली जाते. केक कट करताना ते दोघे दिसतात, आणि सगळेजण दोघांच्या वाढदिवसानिमित्त खूप आनंदी असतात. केक कट करत असतानाच सायलीला चक्कर येते आणि ती खाली पडते. हे पाहून घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आता सायलीला नेमकं काय झालं असेल हे मालिकेच्या आगामी भागात कळेल.