काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत आरोपीने पोलिसांकडे मोठे वक्तव्य केले आहे. आरोपीने म्हटले आहे की, यापूर्वी सलमान खानला मारण्याची त्याची योजना होती. पण पण सुरक्षेच्या कारणास्तव तो तिथे पोहोचला नाही. नुकतंच सलमान खानच्या शूटिंग सेटवर एक अनोळखी व्यक्ती घुसली होती. यावेळी बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शूटरने सांगितले की, सलमानला मारण्याची योजना होती. पण त्याचा हा प्लॅन फसला. (Shooter Plan To Kill Salman Khan)
झिशान सिद्दिकीसोबत बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं नावही बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांच्या हिटलिस्टमध्ये होतं, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेनं २६ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या चौकशीदरम्यान शूटरने सलमान खानलाही टार्गेट केले होते. मात्र सलमान खानला धमकी आल्यापासूनच तो पोलिसांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या गराड्यात होता. मात्र सलमानच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे बिश्नोई गँगचा शूटर त्याच्या योजनेत यशस्वी होऊ शकला नाही.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणला भेटताच ‘ती’ मुलगी ढसाढसा रडू लागली अन्…; अजूनही झापुक झुपूकचं क्रेझ, व्हिडीओ व्हायरल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या शूटिंग सेटवर एक चाहता बेकायदेशीरपणे घुसला. त्यानंतर तेथील लोकांनी स्थानिक पोलिसांना याबद्दल माहिती दिली. चौकशीनंतर पोलिसांनी सांगितले की, हा व्यक्ती सलमानचा मोठा चाहता आहे आणि त्याला भेटण्याची इच्छा आहे. पोलीस या प्रकरणाचा आणि अज्ञात व्यक्तीच्या पार्श्वभूमीचा तपास करत आहेत.
आणखी वाचा – वडिलांना कॅन्सर झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे उपचारासाठीही पैसे नाहीत, मदतीचं आवाहन, भावुक व्हिडीओ समोर
दरम्यान लॉरेन्स गँगच्या धमक्यांमुळे अभिनेता सलमान खान आधीच Y+ श्रेणीच्या सुरक्षेत होता, पण बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर त्याच्या सुरक्षेखाली तैनात असलेल्या पोलिसांची संख्या आणखी वाढवण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी दोन एस्कॉर्ट वाहनांसह सुमारे ५०-६० पोलीस अधिकारी सध्या तैनात आहेत.