Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायलीला एका निनावी नंबरवरुन फोन कॉल येत असतो आणि मॅसेजही येत असतात. यामुळे अर्जुन हतबल झालेला असतो. सायलीला नेमकं कोण फोन करतंय, तिला कोण मॅसेज करतंय आणि ती कोणाशी इतका वेळ बोलतेय, असे अनेक प्रश्न अर्जुनला पडलेले असतात. न राहवुन सायलीला अर्जुन थेट प्रश्न करतो आणि विचारतो की, तुम्हाला सतत कोणाचे फोन येत आहेत आणि तुम्ही कोणाशी इतक्या हसत खेळत बोलत आहात. हे ऐकल्यावर सायलीला खूप हसू येतं. सायली सांगते, तुम्ही माझ्यावर शंका घेताय का?, इतकंच आहे तर तुम्हीच त्या निनावी नंबरवर फोन करुन विचारून पहा. समोरची व्यक्ती कोण आहे ते मग तुम्हाला कळेल’, असं म्हणते.
अर्जुनलाही धक्का बसतो. सायली थेट आपल्याला नंबरच देतेय म्हणजे नक्की काय प्रकरण आहे म्हणून अर्जुन त्या नंबर वर तो फोन करतो. तर तो नंबर प्रतिमा आत्यांचा असतो. प्रतिमा आत्या समोरुन बोलताच अर्जुनची बोलतीच बंद होते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, सायलीने तुला शेवटी माझा नंबर दिला तर. मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे त्यामुळे तू देखील इतर कोणाला सांगू नकोस’, हे ऐकल्यावर अर्जुनची खूप मोठी फजिती होते आणि अर्जुन सायलीला तोंड न दाखवताच निघून जातो. सायलीला यावर खूपच हसू येत असतं.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींची माफी मागण्यास अनुष्काचा नकार, ही चूक महागात पडणार का?, पुढे काय होणार?
त्यानंतर अर्जुन चैतन्यकडे येतो आणि या सर्व प्रकरणाबद्दल त्याला सांगतो. ‘मी त्यांचा पाठलाग केला, त्यांचे मॅसेज वाचले, त्यांचं बोलणं ऐकलं’. यावर चैतन्य सांगतो की, ‘आता तुला त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घ्यावच लागेल. तू त्यांच्यावर संशय कसा घेऊ शकतोस’. तर इकडे मधु भाऊ आणि पूर्णा आजी येतात आणि सायलीकडे चहा मागतात. तेव्हा सायली अर्जुनचा विचार करत असते. कारण यापूर्वीच सायलीचं कुसुमशी बोलणं झालेलं असतं. तेव्हा कुसुमने सांगितलेलं असतं की, ‘मधु भाऊ तुमचा संसार पाहून खूप खुश आहेत आणि ते अर्जुनचा भरभरुन कौतुक करत होते. इतकंच नव्हे तर ते तुमचा सुखी संसार पाहून डोळे मिटावेत असं सुद्धा म्हणत होते. त्यामुळे आता तू लवकरात लवकर विचार करा’, कुसुमच्या या बोलण्याने सायली अर्जुनचाच विचार करत असते.
तेव्हा पूर्णा आजी सायलीला अर्जुनला कॉफी हवी आहे असं मुद्दाम म्हणते. तेव्हा सायली भानावर येते. अर्जुनचं नाव घेऊन सायली भानावर येतात सगळेजण तिला चिडवू लागतात. त्यानंतर सगळेजण फोन करुन प्रतिमाला घरी बोलावून घेतात. तेव्हा प्रिया सुद्धा प्रतिमा बरोबर येण्याचा हट्ट धरते आणि यापुढे कोणती चूक करणार नसल्याचे सांगते.