Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. अनुष्काच्या बोलण्यानं अहिल्यादेवी नाराज झालेल्या असतात. शिवाय अहिल्यादेवी अनुष्काला धडा शिकवण्यासाठी आणि तिला हरलेलं पाहण्यासाठी वाटेल त्या थराला जायला तयार झालेल्या असतात. मोहनला सांगून अहिल्यादेवी अनुष्काच्या ऑफिसवर धाडही टाकतात शिवाय घरही सील करण्याचा आदेश देतात. मात्र अनुष्का या गोष्टीला बिलकुल घाबरत नाही. तर अहिल्यादेवींनी केलेली ही गोष्ट आदित्य प्रीतम व घरातील इतर सदस्यांनाही पटत नसते. अहिल्यादेवी पारुला याबाबत विचारतात तेव्हा पारू सांगते की, तुम्ही जे करताय ते योग्यच करताय. यावर अहिल्यादेवी घरातल्यांसमोर सांगतात की, जिच्याबद्दल अनुष्का बोलली आहे तिला मी दिलेली शिक्षा चुकीची वाटत नाहीये तर तुम्ही यावर आक्षेप का घेत आहात.
इतकं होऊनही आदित्य अनुष्काला घरी बोलावून घेतो. अहिल्यादेवींशी बोलून आपण यावर तोडगा काढू असं तो अनुष्काला सांगतो. यावर आदित्यच्या शब्दाखातर अनुष्का किर्लोस्कर मेन्शनमध्ये यायला तयार होते. अहिल्यादेवींना भेटायला अनुष्का येते तेव्हा तिची गाडी गेट बाहेरच थांबवली जाते आणि गेट बाहेरुन तिला आत चालत यावे लागते. त्यानंतर घराबाहेर चप्पल काढून तिला ताटकळत ठेवले जाते आणि सांगितले जाते की, अहिल्यादेवींनी तुम्हाला इथेच थांबायला सांगितलं आहे. त्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत. प्रीतम आईला येऊन सांगतो की, अनुष्काला तू बाहेर उभा का केल आहेस?, तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, मी आणि मोहन सुद्धा तिला भेटायला गेलो होतो. ती सुद्धा आम्हाला न भेटताच निघून गेली.
यावर आदित्य अहिल्यादेवींना म्हणतो की, आई तू हा विषय इतका का ताणत आहेस. तू असं एखाद्याशी कसं वागू शकतेस?, त्यानंतर त्या अनुष्काला आत मध्ये बोलावून घेतात. तेव्हा पारू अनुष्काला आतमध्ये आणायला जाते. पारू अनुष्काला सांगते की, आज तुम्ही जरा अहिल्यादेवींशी सांभाळूनच बोला. त्या खूपच रागात आहेत. त्या माझ्या देवी आई आहेत आणि मी त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल जाऊन त्यांच्यासमोर काहीच बोलू नका’, असेही सांगते. त्यानंतर अनुष्का घरात येते. तेव्हा ती अहिल्यादेवींच्या पायाजवळ बसते. दहा वाजेपर्यंतची अनुष्काला मुदत दिलेली असते मात्र अनुष्का अहिल्यादेवींच्या पायाजवळ बसते आणि त्यांचा आशीर्वाद घेते.१ यानंतर अहिल्यादेवींना वाटतं की, अनुष्काने माफी मागितली आहे, म्हणून ते मोहनला फोन करायला सांगतात आणि सगळ्या गोष्टी ताबडतोब थांबवायला सांगतात.
आणखी वाचा – ‘शिवा’ फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटात पार पडलं व्याहीभोजन, फोटो व्हायरल
मात्र, अनुष्का आदित्यला थांबवते आणि म्हणते की, मी तुमची माफी मागितलेलीच नाहीये. मी फक्त तुमचा आशीर्वाद घेतला आणि मी अजूनही हरलेले नाहीये’, असं अनुष्का अहिल्यादेवींना म्हणते. आता मालिकेच्या पुढील भागात काय होणार?, अहिल्यादेवी अनुष्काला काय शिक्षा देणार?, अनुष्का अहिल्यादेवींची माफी मागणार का? पारू या सहभाग घेईल का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.