Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे सायली रेस्टॉरंटमध्ये पोहोचलेली असते. सायली रेस्टॉरंटमध्ये पोहोचून अर्जुनची वाट पाहत असते तर सायली पाठोपाठ अर्जुनही रेस्टॉरंटमध्ये येतो. दोघेही एकमेकांसमोर येतात तेव्हा कोणाला काय बोलावं हे कळत नाही आणि दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. कोणी कशी सुरुवात करायची, आपल्या मनातील भावना कशा व्यक्त करायच्या याचा दोघेही विचार करत असतात. तर इकडे प्रिया सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि तिची कारस्थान सुरुच असतात. आज सायली-अर्जुन दोघांचा वाढदिवस आहे आणि आज सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे सगळ्यांसमोर यायलाच हवं असा निश्चय प्रिया करते.
प्रिया अस्मिताच्या खोलीत येरझाऱ्या घालत असते. तेव्हा तिची चिडचिड पाहून अस्मिता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि सांगते की, अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको आहेत. तू इतकी चिडचिड करु नको. सायली मला सुद्धा या घरात नको आहे. पण आता काय करणार. यावर प्रिया सांगते की, तू मला मदत कर. आज अर्जुन आणि सायली दोघेही घरामध्ये नाही आहेत. तर आज आपण त्यांची खोली शोधून काढू. काही ना काही पेपर्स माझ्या हाती लागतीलच आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याचा खुलासा देखील होईल, असं म्हणते.
आणखी वाचा – नातीसाठी आजीचं कौतुकास्पद पाऊल, दीपिका पदुकोणची लेक तीन महिन्यांची होताच सासूने दान केले केस, कारण…
तेव्हा अस्मिता प्रियाला मदत करण्याचा ठरवते आणि अस्मिता अर्जुन नक्की बाहेर गेलाय की नाही हे पाहायला जाते. तेव्हा प्रियाला हसू येत. त्यानंतर दोघीही अर्जुनच्या खोलीत शोधाशोध करतात तेव्हा सगळे पेपर्स इकडे तिकडे टाकून देतात आणि प्रिया काही झालं तरी आज पेपर्स हाती लागलेच पाहिजे असा निश्चय करुन ते पेपर्स शोधू लागते. तर इकडे अर्जुन व सायली एकमेकांसमोर येतात. दोघेही एकमेकांसमोर काहीच बोलत नाही तेव्हा अर्जुन पुढाकार घेत सायली समोर बोलायला जातो.
आणखी वाचा – जया बच्चन यांना खूपच घाबरतात अमिताभ बच्चन, लग्नाच्या ५० वर्षांनंतरही तेच वाद, म्हणाले, “एक शब्दही…”
एवढ्यात. त्याला कल्पनाचा फोन येतो आणि कल्पना फोनवर प्रचंड चिडलेली असते. कल्पनाचा हा चिडलेला आवाज ऐकून अर्जुनही घाबरतो आणि सायली व अर्जुन तातडीने तिथून निघून येतात. आता मालिकेच्या पुढील भागात काय होणार हे सारं पाहणं रंजक ठरेल.