स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आलं. त्यामुळे सुभेदारांच्या घरातले आणि मधुभाऊ यांनी सायली-अर्जुनच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला. अर्जुन याप्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो पण, त्याचं कोणीही ऐकत नाही. अखेर दोघांनाही वेगळं केलं जातं. सायलीला मधुभाऊ आपल्या घरी राहण्यासाठी घेऊन जातात. पण असं असतानाच सायली आणि अर्जुनमध्ये दुरावा आला असला तरीही त्यांचं नातं प्रेमाने बहरत असताना दिसत आहे. (Tharla Tar Mag serial update)
सत्य समोर आल्यामुळे अर्जुन आणि सायली यांच्यात दुरावा आला असला तरीही दोघे त्यांचं नात वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत. त्यातच आता अर्जुन सायलीवरच्या त्याच्या प्रेमाची कबुली देणर आहे. याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. शहर सोडून निघालेल्या सायलीला एसटी स्टँडवर अर्जुन प्रपोज करणार आहे. त्यामुळे सायली-अर्जुन यांच्या नात्याची नवी सुरुवात होणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सायली बॅग घेऊन निघालेली असते, इतक्यात अर्जुन एसटी स्टँडवर येतो आणि माइकवर सर्वांसमोर म्हणतो, “मिसेस सायली… आज मला अख्ख्या जगासमोर सांगायचं आहे आय लव्ह यू मिसेस सायली.” अर्जुनने प्रेमाची कबुली दिल्यावर एसटी स्टँडवरचे सगळे लोक उत्साहाच्या भरात टाळ्या वाजवून या जोडप्याचं कौतुक करू लागतात. मालिकेचा हा नवीन प्रोमो चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या अडचणी थांबता थांबेना, चित्रपटात ‘तो’ सीन करणं भोवलं, काँग्रेस नेत्याकडून तक्रार दाखल
सायली बॅग घेऊन निघालेली असते, इतक्यात अर्जुन एसटी स्टँडवर येतो आणि माइकवर सर्वांसमोर म्हणतो, “मिसेस सायली… आज मला अख्ख्या जगासमोर सांगायचं आहे आय लव्ह यू मिसेस सायली.” अर्जुनने प्रेमाची कबुली दिल्यावर एसटी स्टँडवरचे सगळे लोक उत्साहाच्या भरात टाळ्या वाजवून या जोडप्याचं कौतुक करू लागतात.