मराठी ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वामधून निक्की तांबोळी ही चांगलीच चर्चेत आले. सुरवातीपासूनच निक्की तांबोळी ही चांगलीच चर्चेत राहिली. ‘बिग बॉस’मधील निक्कीचा प्रवास वेगवेगळ्या छटांचा राहिला. पण तिचं बेधडकपणे बोलणं यामुळे ती चर्चेत राहिली. निक्की तिच्या भांडणांमुळे कायम चर्चेत राहिली. तिला कन्टेन्टची महाराणी म्हटलं जात होतं. तिचे ‘बिग बॉस’मधील डायलॉग चांगलेच प्रसिद्ध ठरले. अशातच आता निक्की एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर आता तिने पंजाबी मनोरंजन क्षेत्राकडे वळली आहे. याबद्दल तिने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. आता लवकरच ती एका चित्रपटाच्या आयटम सॉंगमध्ये दिसणार आहे. (nikki tamboli in punjabi movie)
निक्कीचा हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. निक्कीला चाहत्यांची खूप पसंती मिळते. ती सोशल मीडियावरही अधिक सक्रिय असलेलीदेखील बघायला मिळत आहे. ती चाहत्यांबरोबर प्रोफेशनल लाईफ शेअर करत असते. निक्कीने सांगितले की, “मी ‘बदनाम’ या चित्रपटाचा हिस्सा बनणार आहे. यासाठी मला खूप आनंद होत आहे. हे एक असं गाणं आहे ज्यामुळे तुम्ही उठून नाचायला सुरुवात कराल. एका मस्त टीमबरोबर काम करुन खूप धमाल आली. त्यासाठी मी खूप आभारी आहे”.
या गाण्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना हे गाणं नक्की आवडेल”. या गाण्याला सुनिधी चौहानने आवाज दिला आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२५ साली प्रदर्शित होणार आहे. निक्की लवकरच ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्कीची झलक पाहायला मिळत असून तिच्या अगदी शेजारी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही आहेत.
आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
या व्यतिरिक्त तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख, दीपिका कक्कड असे बरेच प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. ‘बिग बॉस’मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी निक्की आता या शोमध्ये काय नवीन जादू करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे