Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. ही मालिका सुरु झाली तेव्हापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेतील सायली अर्जुनच्या पात्राला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. मालिकेत सायली व अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पाहायला मिळत आहे. अद्याप त्यांनी त्यांच्या या गुपित लग्नाची गोष्ट कोणालाच सांगितलेली नसते, त्यामुळे त्यांच्यासमोर खूप मोठा पेच असतो. इतकंच नव्हे तर आता सायली व अर्जुन दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मालिकेत सध्या दोघांच्या प्रेमाचा ट्रक पाहायला मिळत आहे. सायली व अर्जुन एकमेकांच्या प्रेमात गुंफत चालले आहेत, मात्र अद्याप दोघांनी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिलेली नाही.
सध्या मालिकेत सायली व अर्जुन यांची लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. मालिकेच्या आगामी भागात अर्जुन व सायली एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देणार असल्याचं समोर आलं. तेव्हापासून साऱ्यांच्या नजरा दोघांकडे वळल्या आहेत. मात्र प्रियाला सायली व अर्जुन एकत्र यावेत असं वाटत नाही आहे. ती त्यांच्या मागावर असते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची प्रियाला भनक लागलेली असते, त्यामुळे ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स शोधत असते. आता अखेर प्रियाच्या शोधाला पूर्णविराम मिळाला आहे.
मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, या प्रोमोमध्ये प्रियाच्या हाती सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स लागले आहेत. “हॅप्पी बर्थडे टू यु, हॅप्पी बर्थडे अर्जुन सायली, माझ्या सगळ्यात जवळच्या दोन व्यक्तींचे एकाच दिवशी वाढदिवस. मग गिफ्ट पण एकदम धमाकेदार असायला हवं ना, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स. आता नाही देणार हा. थेट वाढदिवशी देणार. हे वर्ष आणि अर्जुन-सायलीच नातं एकदमच संपणार”, असं प्रिया या प्रोमोमध्ये बोलताना दिसत आहे.
‘ठरलं तर मग’च्या ऑफिशिअल पेजवरुन मालिकेचा हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अखेर प्रियाच्या हाती सायली व अर्जुनचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स लागले आहेत. इतकंच नाही तर ते पेपर्स घेऊन ती सुभेदारांच्या घरीही जाणार आहे. कल्पना सायली व अर्जुनला जाब विचारतानाचा एक नवा प्रोमोही याआधी पाहायला मिळाला.