काही मालिका पात्र प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मालिकेतील पात्र आपल्याच घराचा भाग असल्याचा प्रेक्षक सांगतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अमोलच्या आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी अमोलच्या सगळ्या इच्छा आणि हट्ट सगळे पूर्ण करत आहेत. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे.
अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये एक मुलगा दवाखान्यात असं म्हणतो की, “माझ्याबरोरबर् आता कोण नाहीये, माझं अॅडमिशन करुन घ्या”. त्यानंतर तिथे अमोलचे कका-काकी येतात आणि असं म्हणतात की, “काय झालं काही प्रोब्लेम आहे का?”. तेव्हा दवाखान्यातील महिला त्यांना असं म्हणते की, “या लहान मुलाच्या जबाबदारीपत्रावर सही करायला कुणी नाही. त्यामुळे आता आम्ही काय करावं हा प्रश्न पडला आहे”.
आणखी वाचा – “बुरखा घाल, नमाज पठण कर”, शाहरुख खानने पत्नी गौरीकडे केली मागणी, कुटुंबियांनाही बसला धक्का, नेमकं काय झालं?
यानंतर रुपाली आणि स्वप्नील दवाखान्यातील त्या महिलेला असं म्हणतात की, “आम्ही सही केली तर चालेल का?” यावर ती महिलादेखील उत्तर देत “हो” असं म्हणते. त्यानंतर अमोलच्या चेहऱ्यावर हास्य उमलते आणि त्याच्या डोक्यात रुपाली व स्वप्नील यांच्यासाठी मुलगा दत्तक घेण्याचा विचार येतो. त्यानंतर हीच गोष्ट अमोल अर्जुनला सांगतो. याबद्दल तो अर्जुनला असं म्हणतो की, “मोठ्या आई-बाबाकया आनंदासाठी काय तरी करायला पाहिजे. त्यांच्याशी बोलून त्यांच्यासाठी मुलगा दत्तक घेतला तर?”.
त्यामुळे आता अमोलचा हा निर्णय अर्जुनला पटणार का? त्याच्या या कल्पनेला रुपाली आणि स्वप्नील तयार होणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसंच अमोलची ही कल्पना सर्वांचं आयुष्य बदलू शकेल का? हेही प्रेक्षकांना पुढील भागात पाहायला मिळणार आहे.