Monika Dabhade Shared Goodnews : काही दिवसांपूर्वीच ठरलं तर मग फेम अभिनेत्री मोनिका दाभाडेने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली होती. मोनिका लवकरच आई होणार असल्याचं समोर आलं होत आणि तेव्हपासून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. यानंतर आता मोनिकाने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. मोनिका आई झाली असून तिने चिमुकलीला जन्म दिला आहे. मोनिकाच्या घरी चिमुकल्या पाहुणीच आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली आहे.
मोनिकाने सोशल मीडियावर नवऱ्यासह आणि चिमुकल्या लेकीबरोबरचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. “दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो. गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो आणि नवे पर्व सुरु.१५.०३.२०२५”, असं कॅप्शन देत मोनिकाने ही गुडन्यूज चाहत्यांसह दिली आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनी मोनिका आई झाली आहे. आणि आई झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत आहे. अभिनेत्रीने आई झाल्याची पोस्ट शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – मालिकेत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्याचा लाखो रुपयांचा फोन चोरीला, व्हिडीओमध्ये सांगितला संपूर्ण प्रकार
मोनिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. इतकंच नव्हे तर मोनिकाच स्वतःच असं युट्युब चॅनेलही आहे. ज्यावर ती अनेकदा व्लॉगिंग करताना दिसते. आई होणार असल्याची आनंदाची बातमी तिने इस्टाग्रामद्वारे दिली होती. यावेळी तिने नवऱ्याबरोबर पोज देत हातात लहान बाळाचे शूज असलेला फोटो शेअर केला होता. यानंतर आई होताच आता अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे,
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ला अधिकाधिक पुरस्कार न मिळण्यावरुन प्रेक्षकांची नाराजी, मालिका अव्वल स्थानावर तरीही…
ठरलं तर मग या मालिकेत मोनिका अस्मिता हे नकारात्मक बाजू असणारे पात्र साकारत आहे. आता सध्या गरोदरपणामुळे मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मोनिकाचं डोहाळ जेवणही ठरलं तर मग च्या सेटवर अगदी थाटामाटात साजरं करण्यात आलं होतं.