Star Pravah Parivaar Puraskar 2025 : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार २०२५ हा सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेल्या १४ मालिकांच्या यादीत कोणत्या मालिकेला किती पुरस्कार मिळाले आणि कोणाकोणाला काय काय पुरस्कार मिळाला आहे हे जाणून घेण्याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात महा मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेने बहुमान पटकवला. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली ही मालिका महा मालिका म्हणून अव्वल ठरली. मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यानंतर टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका नेहमीच वरचढ असलेली पाहायला मिळाली.
मालिकेतील कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, ‘महाराष्ट्राची महामालिका’ आणि ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका -प्रिया’ हे दोन पुरस्कार वगळता या मालिकेतील अन्य कोणत्याही कलाकाराला एकही पुरस्कार मिळाला नाही यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. स्टार प्रवाह’ वाहिनीने पुरस्कार सोहळा संपल्यावर इन्स्टाग्रामवर ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ हा सोहळा तुम्हाला कसा वाटला? असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला यावर उत्तर देत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – एआर रेहमान रुग्णालयामधून घरी, तब्येतीबाबत पत्नीचा खुलासा, म्हणाल्या, “आम्ही अजून घटस्फोट घेतला नाही”
‘ठरलं तर मग’ मालिकेला कमी पुरस्कार मिळाले म्हणून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. चाहत्यांनी कमेंट करत, “मी ‘ठरलं तर मग’ मालिकेची चाहती नाही पण सायली-अर्जुन अवॉर्ड डिझर्व्ह करत होते. निदान वाहिनीने त्यांच्यासाठी वेगळे विभाग करणं अपेक्षित होतं”. “‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये सायली नावाच्या मुलीने उत्कृष्ट लेकीचं एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या वडिलांसाठी कशाप्रकारे संघर्ष करते हा प्रकार एक सर्व मुलींसाठी मार्गदर्शन ठरतोय म्हणून तिला सर्वप्रथम पारितोषिक द्यायला पाहिजे होतं”, “अजिबात आवडला नाही सायली-अर्जुनला एकही पुरस्कार मिळाला नाही”, “कार्यक्रम अजिबात आवडला नाही सायलीला सर्वोत्कृष्ट मुलगी पुरस्कार मिळाला हवा होता”, नाराजी दर्शविली.
आणखी वाचा – घरात कापूरचा वापर केल्यास खरंच सकारात्मक उर्जा मिळते का?, शास्त्र काय सांगतं?

तर काहींनी “अनपेक्षित वाटला. स्टार प्रवाहने सायली-अर्जुनवर अन्याय केला आहे. ज्यांच्या अभिनयामुळे मालिका आणि चॅनेल टॉपला आहे त्यांनाच तुम्ही अवॉर्ड पासून वगळले. हे खूप चुकीचे केले”, “महामालिका ‘ठरलं तर मग’ हीच होती. काल आलेली आई बाबांची नाही. दोन महिने नाही झाले त्या मालिकेला तर ती कशी होऊ शकते महामालिका. तुम्ही ‘ठरलं तर मग’ या मालिकेची फसवणूक करताय का?”, “सायली-अर्जुनला एक पण अवॉर्ड नाही. मुलगी, सून, बेस्ट जोडी यापैकी एक तरी द्यायचा होता आता सायली बेस्ट नाही का राहिली?, त्यांच्या बाबतीत हे बरोबर नाही झाले”, असं मत स्पष्ट मत मांडलं.