रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’च्या अर्जुनने सांगितली त्याच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी, बायकोला I Love You ही म्हटला नाही अन्…; म्हणाला, “माझी पत्नी…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 4:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharla Tar Mag fame Arjun aka actor Amit Bhanushali shared his real life love story.

'ठरलं तर मग'च्या अर्जुनने सांगितली त्याच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी, बायकोला I Love You ही म्हटला नाही अन्...; म्हणाला, "माझी पत्नी..."

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत सायली-अर्जुन यांच्यातील प्रेम हळूहळू बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूपच भावते. तो प्रेक्षकांचा प्रचंड आवडता अभिनेता बनला आहे. मालिकेप्रमाणे त्याची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरीही अगदी हटके आहे. त्याची बायको श्रद्धा ही एका मराठी कुटुंबातून आली आहे.

अमितने खऱ्या आयुष्यात प्रेमविवाह केला असला तरी अमितने त्याच्या बायकोला अजूनही प्रपोज केलेलं नाही. स्वत: अमितने याबद्दल सांगितले आहे. ठरलं तर मग मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले असून यानिमित्ताने ‘इट्स मज्जा’ने अमित भानुशालीबरोबर खास संवाद साधला. यावेळी अमितला त्याच्या खऱ्या आयुष्यातील बायकोबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

याचे उत्तर देत अमितने असं म्हटलं की, “खऱ्या आयुष्यात मी किंवा पत्नी श्रद्धा आमच्यापैकी कुणीच एकमेकांना तसं प्रपोज केलं नाही. मी तिला “लव्ह यू” असं कधीच म्हटलं नाही. मी थेट तिला “लग्न करशील का?” असं विचारलं. आम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलो नाही. त्याच्या खूप नंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्हाला कळलं की, आम्ही एकाच शाळेत होतो”.

आणखी वाचा – “शिवाबरोबर मला काहीच संबंध ठेवायचा नाही आणि…”, मालिकेत भांडण पण खऱ्या आयुष्यात एकमेकांशी कसे वागतात शिवा व आशू?, स्वतःच केला खुलासा

सोशल मीडियाद्वारे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांनी गप्पा मारत एकमेकांचे नंबर घेतले. बोलता बोलता त्यांना ते अजूबाजूच्याच सोसायटीत राहत असल्याचे कळलं. हळू हलूय त्यांच्यात मैत्री झाली. पुढे मैत्रीच रुपांतर तहत मैत्रीत झाले आणि मग अमितने श्रद्धाला थेट लग्नासाठीच मागणी घातली त्यानंतर केवळ १५ दिवसांच्या रिलेशनशिपनंतर दोघे लग्नबंधनात अडकले”.  

आणखी वाचा – ना भरजरी साडी, ना नाकात नथ; लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी अशी नटली होती तितीक्षा तावडे, साधेपणाने वेधलं लक्ष

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त मालिकेतील कलाकारांनी सेलिब्रेशन केलं. मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. सायली-अर्जुनच्या जोडीने तर प्रेक्षकांना चांगलीच भुरळच घातली आहे. अर्जुन सुभेदारची भूमिका साकारणारा अमित भानुशाली अनेकदा चर्चेत असतो.

Tags: amit bhanushaliAmit Bhanushali Love Storymarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
sonakshi sinha mehndi ceremony

सोनाक्षी सिन्हाच्या हातावर रंगली होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी, पण लग्नाबाबत अभिनेत्रीचे भाऊ नाराज?, कुठेच दिसले नाहीत अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.