गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शिवाबरोबर मला काहीच संबंध ठेवायचा नाही आणि…”, मालिकेत भांडण पण खऱ्या आयुष्यात एकमेकांशी कसे वागतात शिवा व आशू?, स्वतःच केला खुलासा

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shiva serial fame Purva Phadke and Shalva Kinjawadekar shared their special bond of behind the scenes

"शिवाबरोबर मला काहीच संबंध ठेवायचा नाही आणि…", मालिकेत भांडण पण खऱ्या आयुष्यात एकमेकांशी कसे वागतात शिवा व आशू?, स्वतःच केला खुलासा

झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘शिवा’ ही मालिकाही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील शिवा व आशू यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत असून त्यांच्यावर चाहत्यांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. नुकतच मालिकेत दिव्या पळून गेल्याने आता आशुबरोबर शिवाचे लग्न होत असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला.

यामुळे शिवा व आशू यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. याचनिमित्ताने ‘शिवा’ मालिकेतील आशू व शिवा म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर व अपूर्वा फडकेबरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांनी मालिकेतील कथानकाबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, “मला आता शिवाबरोबर काहीही संबंध ठेवायचा नाही. माझं तिच्याबरोबरचं नातं आता संपलं आहे. पण भाऊंमुळे आता तिच्याबरोबर राहावं लागत आहे”.

आणखी वाचा – Video : सासरी गावातल्या मंडळींसमोर भजन गाण्यात मग्न झाली मुग्धा वैशंपायन, गायिकेच्या संस्कारांचं कौतुक, म्हणाले, “इतका साधेपणा…”

यापुढे त्यांनी पडद्यामागील त्यांच्या खास बॉण्डबद्दल विचारण्यात आले. याबद्दल सांगताना पूर्वाने सांगताना असं म्हटलं की, “आमचं एकमेकांशी छान जुळून येत आहे. आम्ही एकमेकांना खूप त्रास देतो. एखाद्या नवीन गोष्टीत जुळवून घेताना वेळ लागतो. तेवढा वेळ आम्ही घेतला आणि आता आम्ही एकमेकांशी फारच छान वागत आहोत. आम्ही एकमेकांना घालून पाडूनही बोलत असतो. पण तेच आमच्या नात्यातलं गमक आहे”. यापुढे त्यांनी आमचं ऑफस्क्रीन जास्त पटत नसल्याचेही सांगितले.

आणखी वाचा – “मी साफ नकारच दिला होता पण…”, ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेचा होता नकार, म्हणाला, “परिक्षकाचा मान…”

दरम्यान, नुकतेच शिवाच्या पहिल्या वटपौर्णिमा पूजेसाठी रामभाऊ व पूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण आशूवर वार होतो. तिकडे शिवा आशूच्या मदतीला येते. वटसावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा या गुंडांनापासून कशी करणार? हे पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newspurva phadkeShalva Kinjawadekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
armaan malik on wives

अरमान मलिकला रात्री पहिल्या पत्नीबरोबर एकत्रित वेळ घालवण्याची अधिक आवड, दुसऱ्या पत्नीसमोरच म्हणाली, "ती जास्त रोमँटिक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.