chala hawa yeu dya news season : जवळपास १० वर्ष प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करणाऱ्या शोमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ या शोचे नाव आवर्जून घेतले जाते. १० वर्ष पूर्ण होताच या शोने ब्रेक घेत प्रेक्षकांना खूप मोठा धक्का दिला. पुन्हा हा शो केव्हा सुरु होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या, अशातच काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ शो सुरु होणार असल्याचं समोर आलं आणि साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. २६ जुलै म्हणजे आजपासून या शोचे नवे पर्व सुरु होत आहे. यंदाच्या या नव्या पर्वाच स्वरूप काहीस बदलण्यात आलं आहे. यंदाच्या या नव्या पर्वात महाराष्ट्रातील विविध भागांतून विनोदवीरांची निवड करण्यात आली आहे. आणि हे विनोदवीर गँगलीडर्सच्या टीममध्ये सहभागी होणार आहेत.
कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे यंदाच्या पर्वातील गँगलीडर्स आहेत. तर यंदाच्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळत आहे. मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा चला हवा येऊ द्याच्या मंचावर ही कलाकार मंडळी धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहेत. अशातच या शोचे नवे पर्व सुरु होणार म्हणून अभिनेता कुशल बद्रिकेच्या भावना दाटून आल्या आहेत. याबाबत अभिनेता सोशल मीडियावर व्यक्तही झाला आहे.
आणखी वाचा – “लहान मुलाला तरी सोडा”, दिसण्यावरुन देवोलिनाच्या लेकाला ट्रोल करताच चाहते भडकले, म्हणाले, “नीच आणि विचित्र…”
कुशल बद्रिके सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच कुशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोचे नवे पर्व सुरु होत असल्याने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “नव्याच्या उंबरठ्यावर जुनी काही पानं चाळली गेली, आणि मन भरुन आलं. पण माझे बाबा कायम म्हणायचे, माणसाला सोडून देता आलं पाहिजे, धरुन ठेवायला आपण काय पिंपळावरचं भूत आहोत. माणसाने जुन्याची कास सोडायची आणि नव्याची आस धरायची. आज ती वेळ येऊन ठेपली आहे”.
आणखी वाचा – IPL च्या खेळाडूकडून १७ वर्षीय मुलीवर बलात्कार, दुसऱ्यांदा FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?
पुढे त्याने लिहिलं आहे की, “‘चला हवा येऊ द्या’ नव्याने सुरु होतं आहे, आता नवीन भिडू नवीन राज्य. नव्याने चुकायचं, नव्याने शिकायचं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आमच्या बरोबर असुद्या. या प्रवासात त्यांची गरज आहे”. कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





