‘ठरलं तर मग’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतील स्वतःच स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेच्या कथानकाने व मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. शिवाय या मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. सध्या मालिकेत दिवाळी सण साजरा करण्यात येत आहे. सायली व अर्जुनची पहिली दिवाळी मालिकेत साजरी करण्यात येणार असून त्यांच्या पहिल्या दिवाळीचा सिक्वेन्स मालिकेत पाहायला मिळणार आहे. (Tharal Tar Mag New Promo)
‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या नवनवीन रंजक वळण पाहायला मिळत आहेत. अशातच मालिकेच्या आगामी प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रतिमा व मधूभाऊंची एन्ट्री होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतंय की, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अर्जुन सायलीला खास सरप्राईज देण्यासाठी आश्रमातील मुलांना घेऊन येतो. सायली सगळ्या मुलांना भेटून आनंदी होते आणि त्यांना घरात घेऊन जात असते. तेवढ्यात घरी मधूभाऊंची एन्ट्री होते.
अर्जुन चैतन्यच्या मदतीने मधूभाऊंची काही काळ सुटका करून घेतो. मधूभाऊंना पाहून सायलीला अश्रू अनावर होतात. यावर अर्जुन सायलीला बोलतो, ‘मिस सायली हेच तुमचं दिवाळी पाडव्याचं गिफ्ट आहे’ हे ऐकून सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. सायलीचा हा आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडताना दिसला. सायलीने भरल्या डोळ्यांनी अर्जुनचे हात जोडून आभार मानलेले मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.
लक्ष्मीपूजन पार पडल्यावर अर्जुनने दिवाळीच्या पाडव्याला बायकोला खास गिफ्ट दिल्याने हा सीन पाहण्यासाठी हा एपिसोड कधी येणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर आधी आलेल्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळालं होतं की, सुभेदारांच्या घराजवळ लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रतिमा येते आणि ती कोणाच्याही नकळत तिचं लक्ष्मीचं नाणं रांगोळीवर ठेवून निघते. ते नाणं सायली उचलते आणि पूर्णा आजीला देते, ते पाहून पुर्णा आजी ते नाणं प्रतिमाचं आहे, आणि माझी प्रतिमा इथे येऊन गेली असं सगळ्या सुभेदार कुटुंबीयांना सांगतात.