मराठमोळ्या अभिनेत्रीने थेट दुबईत स्वतःच घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून ओळख मिळवलेली सोनाली कुलकर्णी आहे. आजवर सोनालीने तिच्या अभिनयातून मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावरही सोनाली बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करून चाहत्यांचा संपर्कात राहत असते. (Sonalee Kulkarni On Saie Tamhankar)
अशातच यंदाची दिवाळी सोनालीने दुबईला साजरी केली असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर ही दिवाळी तिने दुबई येथील तिने घेतलेल्या तिच्या नव्या घरी साजरी केली आहे. सोनालीने दुबई येथे स्वतःच नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेत्रीने यंदाची दिवाळी तिच्या दुबई येथील नव्या घरी साजरी केली असून दुबईतील तिच्या नव्या घराची झलक तिने सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर केली.
सोनाली कुलकर्णी आणि तिचा नवरा कुणाल बेनोडेकरने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दुबईत नवीन घर खरेदी केलं आहे. दुबईतील नव्या आलिशान घरातील फोटो शेअर करत अभिनेत्रीने “पाडवा in the new होम” असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे. यानिमित्त सोनालीवर शुभेच्छांचा वर्षांव होताना पाहायला मिळत आहे. सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सई ताम्हणकरने ‘क्यूटी’ अशी कमेंट करत सोनालीच्या लूकचं कौतुक केलं आहे.
सईने केलेल्या या कमेंटवर सोनालीने दिलेल्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने ही नवं घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली. यंदाच्या दीपावलीला तर तिने सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींना नव्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यांच्यासाठी खास दिवाळी पहाटचं आयोजनही करण्यात आलं होतं.
यावरूनचं सोनालीने सईला केलेल्या प्रश्नाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सईने सोनालीच्या पोस्टवर ‘क्युटी’ असं म्हणताच, सोनालीने प्रतिउत्तर देत म्हटलं, “ते सर्व ठीक आहे, पण तू तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेस ते सांग आधी”. यावर सईने प्रतिक्रिया देत “तुमचं लंडन, दुबई झालं की सांगा मॅडम” असं म्हटलं आहे. त्यावर सोनाली “राहू दे, राहू दे” असं म्हणत कमेंट केली आहे.