महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात आज २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. सामान्य नागरीकांसह अनेक कलाकार मंडळीदेखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. अनेक कलाकारांनी मतदानानंतर शाई लावलेल्या बोटाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि या फोटोसह त्यांनी आपल्या चाहत्यांना व मतदारांना मत देण्याचे आवाहनही केलं आहे. अशातच ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रे जुई गडकरीनेदेखील तिचा मतदानानंतरचा फोटो शेअर केला आहे. (jui gadkari vote)
अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात रहात असते. त्याचबरोबर अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे आपल्या कामानिमित्त माहितीदेखील शेअर करत असते. अशातच तिने आज मतदानानंतरचा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमुळे अभिनेत्रीचे कौतुक होताना दिसत आहे. अभिनेत्री जुई गडकरी ही मुळची कर्जतची राहणारी आहे. त्यामुळे आज पार पडणाऱ्या मतदानासाठी ती कर्जतला गेली होती आणि कर्जतहून पुन्हा कामानिमित्त मुंबईला आली आहे.
जुईने याचबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. बोटाला शाई लावलेला फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “मुंबई ते कर्जत, कर्जतला मतदान, मग मतदानानंतर पुन्हा कर्जत ते मढ आयलँड”. तसंच या प्रवासाबद्दल तिने म्हटलं ही की, “ट्रेनने मेट्रो, मेट्रोनंतर रिक्षा, रिक्षाने जेट्टी, जेट्टीवरुन बोट, मग पुन्हा रिक्षा आणि मग रिक्षाने सेटवर”. यापुढे “हे फक्त मतदान करण्यासाठी! होय, एका मताने फरक पडतो… जा आणि मतदान करा!” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केली लग्नाची गोड आठवण, म्हणाली, “पहिल्या दिवसापासूनच…”
दरम्यान, जुईच्या मतदानाच्या या प्रवासासाठी तिच्या अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. जुईने शेअर केलेल्या मतदानाच्या फोटोखाली अनेकांनी कमेंट्स करततीचे कौतुक केले आहे. “जबाबदार आणि आदरणीय”, “जबाबदार नागरिक”, “शाब्बास” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी जुईच्या फोटोला प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी “मतदानाच्या दिवशी सुट्टी नाही का” असा प्रश्नही विचारला आहे. जुईचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.