सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केली लग्नाची गोड आठवण, म्हणाली, “पहिल्या दिवसापासूनच…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 20, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru serial fame Marathi actress Sharayu Sonawane shared a sweet memory about her marriage

'पारू' फेम शरयू सोनावणेने शेअर केली लग्नाची गोड आठवण, नेमकं काय म्हणाली?

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत शरयूने मध्यवर्ती ‘पारू’ची भूमिका साकारली आहे. अल्पावधीत शरयूची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. पारु मालिकेतून शरयूने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. साध्या भोळ्या ‘पारू’ची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली. तिच्या या लग्नाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. पण काही दिवसांपूर्वी तिने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केले होते. (Sharayu Sonawane Marriage)

शरयूने ‘पिंकीचा विजय असो’ मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. १९ सप्टेंबर २०२३ला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अ‍ॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया”. त्यानंतर मे महिन्यात अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. “३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम. आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरे करत आहोत” असं म्हणत तिने हे खास फोटो शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – 20 November Horoscope : मेष, वृषभ आणि कर्क या चार राशींची प्रलंबित कामे बुधवारी पूर्ण होतील, तुमच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

अशातच शरयूने या लग्नाबद्दलची खास आठवण सांगितली आहे. इट्स मज्जाबरोबर साधलेल्या खास संवादम्यान, शरयू असं म्हणाली की, “मी माझं लग्न अगदी खासगी पद्धतीने केलं होतं. फार कुणाला बोलावलं नव्हतं. माझे काही कुटुंबीय आणि मित्रपरिवार या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. आम्ही डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा माहोल हा माझ्यासाठी खूप स्पेशल होता. त्यामुळे लग्नाची फक्त एक खास आठवण नाही सांगता येणार. कारण संपूर्ण लग्न हेच माझ्यासाठी स्पेशल होतं”.

आणखी वाचा – “उगाच दिखावा करतात आणि…”, इंडस्ट्रीमुळे वागणूकीमध्ये बदल झाल्याचा सविता मालपेकरांचं वक्तव्य, म्हणाल्या, “आपलीच माणसं…”

दरम्यान, शरयूचा नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे. जयंत मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे. अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयूसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

Tags: Paaru Fame Sharayu Sonawane Marriage NewsSharayu Sonawane MarriageSharayu Sonawane Marriage Memory
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Tharala Tar Mag serial fame actress Jui Gadkari reached Karjat from Mumbai for voting and again live Karjat for shooting also she shared a post and appealed to vote.

"मुंबईहून कर्जत अन् कर्जतहून थेट मालिकेचा सेट", मतदानानंतर शुटींगसाठी पोहोचली जुई गडकरी, म्हणाली, "एका मताने फरक..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.