Tharal Tar Mag Serial : ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली अनेक वर्ष सुरु असून या मालिकेवर प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून मालिकेवर प्रेक्षक नाराज असलेले पाहायला मिळत आहेत. मालिकेचं कथानक पुढे सरकत नसल्याने प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकावर नाराजीचा सूर उमटवलेला पाहायला मिळतोय. सायली व अर्जुन यांच्यातील वाद दाखवल्याने प्रेक्षकांमध्ये नकारात्मकता पसरलेली पाहायला मिळतेय. मालिकेत सध्या मधु भाऊंची सुटका करण्यासाठी अर्जुनचे प्रयत्न सुरु असतात मात्र सायली कायम त्याच्याजवळ राहावी यासाठी चैतन्य अर्जुनला पर्याय सुचवत मधु भाऊंची केस थोडी लांबवण्यासाठी सांगतो आणि हे सगळं काही बोलणं सायली ऐकते.
त्यामुळे सायलीचा खूप मोठा गैरसमज होतो. अर्धवट बोलणं ऐकल्याने सायली अंदाज बांधते की जाणून बुजून अर्जुन मधु भाऊंची केस लांबवत आहेत. हे ऐकल्यानंतर सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. बोलणं ऐकल्यानंतर सायली गायब होते आणि थेट जाऊन मंदिरात बसते. अर्जुन सायलीला खूप शोधतो ज्यावेळेला सायली त्याला मंदिरात सापडते त्यानंतर सायली त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही. घरी आल्यानंतरही सायली अर्जुनशी काहीच बोलत नाही आणि ते वेगवेगळे झोपतात. सायली हॉलमध्ये झोपते तर अर्जुन बेडरुममध्ये. हे सगळं काही अस्मिता बघते आणि सायली-अर्जुनच्या भांडणाचा कांगावा करते.
आणखी वाचा – तब्बल पाच वर्षांनी ‘आई कुठे…’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, मिलिंद गवळींनी शेअर केला व्हिडीओ
एवढं होऊनही दोघेही काहीच सांगत नाहीत. अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीवर खूपच भडकलेला दिसतोय. प्रोमो मध्ये असं पाहायला मिळतंय की, अर्जुन सायलीला जाब विचारतो की, ‘बेडरुममधून ती खाली का येत नाहीये?’. अर्जुनचा आवाज ऐकून सायली खाली येते आणि तेव्हा तो तिला विचारतो की, ‘तुम्ही ऍडव्होकेट सानेंकडे गेला होता का?’. यावर सायली गोंधळते आणि तेवढ्यात एक माणूस नोटीस घेऊन येतो. साने वकिलांकडूनच ती नोटीस येते. अर्जुन पाहतो तर त्यात घटस्फोटाची कागदपत्र असतात. घटस्फोटाचे पेपर्स पाहून अर्जुनला धक्का बसतो. ‘तुला माझ्याकडून घटस्फोट हवाय?’ असं अर्जुन सायलीला विचारताच सायलीसह सर्वांनाच धक्का बसतो. आता सायलीने अर्जुनला घटस्फोटाची कागदपत्र खरोखर पाठवली का, हे आगामी एपिसोडमध्येच स्पष्ट होईल. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मात्र नाराजी दर्शविली आहे.
आणखी वाचा – अमृता खानविलकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक, कलाकारांकडून कौतुक अन्…
“हे असं प्रिया किंवा अस्मिताने केले असेल. बोअरिंग करु नका प्लीज, ट्रॅक सकारात्मक करा. नाहीतर मालिकेतील रस कमी होईल”, “ही मालिका खूप रटाळ होतेय, काहीतरी बघण्यासारखं दाखवा. जे हवं, जे बघायचं असतं, तेच दाखवत नाही. आहात कुठे? वाटेल तिकडं दाखवत आहात.”, “ही आवडती मालिका आहे आणि त्यामुळे मालिकेचा ट्रॅक असा बिघडवू नका”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.