बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तब्बल पाच वर्षांनी ‘आई कुठे…’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, मिलिंद गवळींनी शेअर केला व्हिडीओ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 1, 2024 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial

तब्बल पाच वर्षांनी 'आई कुठे…' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, मिलिंद गवळींनी शेअर केला व्हिडीओ

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या रंजक वळणाने संपूर्ण प्रेक्षकवर्ग हादरला होता. गेली पाच वर्षे ही मालिका अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या चढाव-उतारांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलही झालेली पाहायला मिळाली. असं असलं तरी या मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा खूप मोठा आहे. मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेमही करताना दिसतात. दरम्यान मालिकेतल्या कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करतात. मात्र आता इतकी वर्ष प्रेक्षकांवर भरभरुन प्रेम करणारी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत मालिका निरोप घेणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी मालिकेतील प्रत्येक कलाकारांचे आणि इतर टीमचे आभार मानले आहेत.

मिलिंद यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “मी मिलिंद गवळी. ‘स्टार प्रवाह’ परिवार आणि Director’s Kut Prodn, कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय शांतीपूर्ण आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची ‘आई कुठे काय करते’ ही ‘स्टार प्रवाह’वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४. हा या मालिकेचा प्रवास होता. या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात आणि लॉकडाऊनच्या काळात स्टार प्रवाहने ‘आई कुठे काय करते’चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा मालिका पाहिली, ती इतकी भावली की अक्षरशः या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं”.

आणखी वाचा – “तर तुमच्या चड्डीत सुतली बॉम्ब टाकेन…”, कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावणाऱ्यांना मराठी अभिनेत्याची धमकी, म्हणाला, “कृपया प्राण्यांना…”

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

पुढे त्याने असं म्हटलं की, “आमच्यावर भरभरुन प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजनजी शाही आणि ‘स्टार प्रवाह’चे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, ‘स्टार प्रवाह’ने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन मग ते ‘होऊ दे धिंगाणा’ किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करुन जाहिरातही केली. DKP चे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो, त्या वास्तूमध्ये आम्ही ४५ ते ५० वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम, पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरुम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं. त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये, असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉपवरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशन वर केले आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही. नमिता वर्तक यांची कथा-पटकथा खूप भारी होती, या मालिकेचे संवाद छान असायचे”.

आणखी वाचा – बहीण असावी तर अशी! लाडक्या भावासाठी अंकिता वालावलकरने गाठलं थेट कोल्हापूर, डीपी दादांना भाऊबीज केली अन्…; फोटो समोर

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “प्रेक्षक कान देऊन ऐकायचे, ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते, दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती, आणि विशेष म्हणजे कलाकार. या मालिकेमध्ये एकापेक्षा एक कलाकार होते, आपल्या आपल्या पात्रात चपख्खल बसलेले. आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश, इशा,अनघा, विमल, शेखर, विशाखा, आरोही, गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी या सर्वांचा आभारी आहे”.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte Marathi Serialmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Varun Dhawan Natasha Dalal Daughter Name

पाच महिन्यांनी वरुन धवनने केला लेकीच्या नावाचा खुलासा, नावही आहे अगदी युनिक, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.