Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्याची दणक्यात सुरुवात झाली आहे. तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही गटांची उत्तम खेळी ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तीन आठवड्यातच घरातील सदस्यांमध्ये मैत्रीचं, बहिण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळालं. आजच्या भागात अभिजीतमुळे अरबाज व निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. तर यामुळे निक्की व अरबाजमध्ये जबरदस्त वाद झाल्याचंही समोर आलं. सध्या या वादाची चर्चा सुरु असताना आता आणखी एक वाद समोर आला आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
हा प्रोमो पाहून साऱ्यांच्याच नजरा वळल्या आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की व अरबाजच्या वादानंतर आता निक्की व वैभव यांच्यातही वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. निक्की व वैभव यांच्यात झालेल्या या वादावरुन टीम एमध्ये फूट पडण्याची शक्यता दिसत आहे. निक्कीने परस्पर निर्णय दिल्याने हा वाद आता चर्चेत आला आहे. निक्कीची ही वागणूक पाहून टीम एमधील साऱ्या स्पर्धकांची मन दुखावली आहेत.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, अभिनेता भडकला, म्हणाला, “मुलीला त्रास होतोय कारण…”
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, वैभव रागारागात म्हणतो, “निक्कीच्या बाजूने मी कोणताच निर्णय घेणार नाही”. तर इकडे निक्की असं बोलते की, “मी माझ्या मतावर ठाम आहे. मी ग्रीन बजर दाबत आहे ‘बिग बॉस’. या निक्कीच्या निर्णयानंतर वैभव तिला विचारतो, “तू परस्पर तुझं तुझं मत मांडलं”. यावर निक्की म्हणते, “मला ‘बिग बॉस’ने विचारलं ना”. तेव्हा छोटा पुढारी सहभाग घेत मध्ये बोलतो, तो म्हणतो, “तुझ्या अशा वागण्याने टीमचा घात होऊ शकतो”.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, अभिनेता भडकला, म्हणाला, “मुलीला त्रास होतोय कारण…”
तेव्हा वैभव आवाज चढवून बोलतो, “मला हक्क आहे तुला पण बोलायचा”. वैभवच हे बोलणं ऐकून निक्की खूप चिडते आणि जस्ट शटअप असं म्हणत निघून जाते. एकूणच वैभव, अरबाज, निक्की यांच्यातील वाद चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता टीम एमधील सदस्य बसून यावर चर्चा करतील का?, हे सार पाहणं रंजक ठरणार आहे.