बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याने घेतले नवीन घर, दाखवली संपूर्ण झलक, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2024 | 9:50 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala tar mag actor fame Amit Bhanushali took the new house special glimpse shown through the video see the details

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याने घेतले नवीन घर, दाखवली संपूर्ण झलक, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते. मालिकेतील अर्जुन व सायली या पात्रांना प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत आहे. मालिकेत सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारलं आहे तर अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशालीने साकारलं आहे. आपल्या अभिनयामुळे कायमचं चर्चेत असणारा हा अभिनेता नुकताच त्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता अमित भानुशालीने नुकतंच एक नवीन घर खरेदी केलं आहे आणि याचा व्हिडीओ त्याने त्याच्या स्वत:च्या युट्यूब चॅनेलद्वारे शेअर केला आहे. अभिनेत्याने त्याच्या युट्यूब चॅनेलद्वारे एका छोटासा व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांना अभिनेता त्याच्या जुन्या घरातून सामान शिफ्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “नव्या घरात आपलं संपूर्ण सामान शिफ्ट करणे म्हणजे खरंच तारेवरची कसरत होते. घर सांभाळणे, शूटिंग सांभाळणे, नवीन वस्तु घेणे, घेतलेले नवीन सामान घरात शिफ्ट करणे म्हणजे खूप मोठा टास्क असतो. तर मी हे सगळं कसं केलं? मी कुठे राहायला जात आहे?, माझ नवीन घर कसं आहे? ते या नवीन व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे”.  

आणखी वाचा – अभिनय बेर्डेला अनोळख्या व्यक्तीकडून घाणेरड्या शब्दात इन्स्टाग्रामद्वारे शिवीगाळ, अकाऊंटला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अन्…; पोस्ट चर्चेत

यापुढे व्हिडीओमध्ये अमितने त्याच्या नवीन घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्याचबरोबर शिफ्टींग करतांना त्याने केलेली मदत ही पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओच्या शेवटी त्याने असं म्हटलं आहे की, “नवीन घरात सामान शिफ्ट करून खूपच धावपळ होते. पण, हा सगळा ताण असताना माझ्या लेकाचं म्हणजेच हृदानचं एक हास्य पाहून मन प्रसन्न होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक नवीन उर्जा निर्माण होते”.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण, देशमुखांच्या सूनेने नवऱ्याला दिल्या हटके शुभेच्छा, पोटात मारलं अन्…

दरम्यान, या व्हिडओखाली कमेंट्समध्ये अमितच्या चाहत्यांनी त्याच्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्या चाहत्यांमध्ये त्याचं नवीन घर पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या त्याचे सगळे चाहते अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Tags: amit bhanushalientertainment newsmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi serialTharala tar magअमित भानुशालीठरलं तर मगमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मालिका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
munawar faruqui roasts mannara chopra for calling herself winner in female category at bigg boss 17

स्वत:ला महिला श्रेणीतील विजेती म्हटल्यावरून मुनव्वर फारूकीने मनारा चोप्राला लगावला टोला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.