Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, कल्पना प्रतिमाकडे येते आणि काही वर्षांपूर्वी प्रतिमानेच दिलेले कानातले तिला दाखवत काही आठवत आहे का असं विचारते. पण प्रतिमा काहीच आठवत नसल्याचं सांगायला मान डोलावते. हे बघून पूर्णा आईला फार वाईट वाटतं. तेवढ्यात तन्वी म्हणजेच प्रिया तिथे येऊन प्रतिमाचा थेट हात पकडत आईवरच्या प्रेमाचे नाटक करते. त्यामुळे प्रतिमा जरा जास्तच घाबरते पण तेवढ्यात सायली तिथे येऊन प्रियाला प्रतिमापासून बाजूला करते.
पूर्णा आई प्रतिमाला तुला घाबरवायला ती नाही आली असल्याचे सांगते. त्यावेळी प्रतिमा खाली बसते आणि फरशीवर झोपायचं आहे असं खुणेने सांगते. हे ऐकून पूर्णा आईला खूप जास्त वाईट वाटतं. शेवटी प्रतिमा खालीच झोपते आणि सायली तिला नीट झोपवते. अस्मिता व प्रिया सायली प्रतिमाच्या अधिक जवळ जाण्यावरुन चर्चा करतात. दुसरीकडे चैतन्य हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रतिमाच्या खोट्या बॉडीच्या डीएनएबद्दल चौकशी करुन येण्याचे अर्जुनला सांगताच अर्जुन रविराज सर तिथल्या डॉक्टर डीनशी बोलणार असल्याचे चैतन्यला सांगतो आणि तिथे तितक्यात तन्वी येते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आर्या रांगडा गडी वैभवच्या प्रेमात, व्यक्त होताना ढसाढसा रडली, एकतर्फी प्रेमाची सुरुवात
तन्वी अर्जुनला कॉफी घेऊन येत असल्याचे सांगते. सायलीला प्रतिमाच्या पिशवीत तिची लहानपणीची बांगडी सापडते. तन्वी अर्जुनला कॉफी देते आणि तो ती नाईलाजाने पण आनंदाने पिण्याचं नाटक करतो. आणि हे नेमकं सायली पाहते. सायलीला अर्जुन व तन्वीचा खूप राग येतो. तर इथे नागराज महीपतला तू मारलेली प्रतिमा परत आल्याने आता तुझ्यामुळे मीही मरणार असल्याचे सांगतो. नागराज महीपतवर प्रचंड संतापतो. महीपतसुद्धा नागराजला आवाज खाली करुन मारायची धमकी देतो.
तर इकडे सायली रागारागात कॉफी बनवून अर्जुनला देते. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, पूर्णा आई प्रतिमाला जेवायला लोणचं पोळी आवडते म्हणून, तिच्या ताटात लोणचं वाढतात. प्रतिमाला सगळं आठवण्यासाठी सुभेदार कुटुंबाचे प्रयत्न यशस्वी ठरणार का हे पाहणं रंजक ठरेल.