Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेम होणे हे नॉमिनेशन व भांडण होण्याइतकं सहज आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात कुणी ना कुणी कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडलं आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्येही सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. अशातच आता रॅपर आर्यादेखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. आर्या वैभवकडे तिच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करणार आहे. पण त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi 5 update )
आर्या, वैभव व इरीना यांच्या प्रेमाचा त्रिकोण लवकरच ‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहायला मिळणार आहे. याचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत. पुढे वैभव म्हणतो, “कसली क्यूट आहे यार ही”. पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ढसाढसा रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो, “काय विषय आहे नक्की?” त्यावर आर्या म्हणते, “मला तू नॅचरली अॅटरॅक्टिव्ह वाटतो”. यावर वैभव म्हणतो, “मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही”. पण आर्या म्हणते, “मला अॅटरॅक्शन होऊ शकतं”.
याच नवीन प्रोमोवर आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील या तिहेरी लव्हस्टोरीवर प्रेक्षक आपली मतं व्यक्त करत आहेत. या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने “‘बिग बॉस’ आहे का वधू वर सूचक केंद्र” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “आता हे स्क्रीप्टेड वाटत आहे” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “‘बिग बॉस’मध्ये दिसून राहण्यासाठी आर्याचा नवीन गेम प्लॅन आहे हा. पण ‘बिग बॉस’वाल्यांनी जो प्रोमो बनवला आहे, जसं की घटस्फोट होत आहे तेही पुराव्यांबरोबर”. तसंच आणखी एकाने महाराष्ट्र भावनांवर चालतो. हे सुरजच्या लाटेतून त्यांना दिसून आलं आहे. त्यासाठी ही नवीन स्क्रिप्ट, कोणताही संबंध नसताना संबंध जोडलेला आहे” असं म्हटलं आहे.
तसंच या प्रोमोखाली अनेकांनी या नवीन लव्हस्टोरीला फेक म्हटलं असून “ही आर्याची नवीन खेळी आहे. लगेच प्रेम कसं काय होतं” अशा आशयाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.