‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, अस्मिता आणि कल्पना सायलीला सकाळी तू कुठे गेलीस असं विचारतात तेव्हा सायली त्यांना कुसुम ताईला बरं नसल्याने तिथे तातडीने जावं लागलं असल्याचं सांगते. तर एकीकडे चैतन्य साक्षी आणि महीपतच्या विरोधात पुराव्यांसाठी महीपतच्या खोलीची झडती घेतो. तेव्हा त्याला कपाटात धारदार शस्त्र आणि बंदूक सापडते. चैतन्य साक्षीच्याही खोलीत झडती घेतो तेवढ्यात साक्षी तिथे येते. (Tharal Tar Mag Serial Update)
कालपर्यंत धडधाकट असलेल्या अर्जुनला अचानक इतका ताप भरल्याने प्रताप अस्वस्थ होतो आणि तो काळजी करु लागतो. त्यावर अश्विन सांगतो, दादांना कोणत्या तरी गोष्टीचा मेंटली स्ट्रेस घेतला आहे त्यामुळे त्याला ताप भरला असल्याचं प्रतापला सांगतो. घरातले सगळे खाली गेल्यावर सायली अर्जुनची माफी मागते आणि लवकर बरं व्हायला सांगते. दुसरीकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये प्रतिमासारख्या दिसणाऱ्या डेड बॉडीची व्यवस्था करायला हॉस्पिटलमध्ये येते. पण तिला तिथे बॉडीज बघून विचित्र वाटतं त्यामुळे तिथून ती निघून जाते.
थोडा आराम केल्यानंतर अर्जुनला बरं वाटतं. अर्जुन मनात असं ठरवतो की, आता सायली पुन्हा घर सोडून गेली नाही पाहिजे. असा निश्चय तो मनाशी करतो. आणि त्यानंतर अर्जुन सायलीला प्रपोज करायचं आहे असं सांगतो. यावर सायली त्याच्याकडे जरा गोंधळून बघते तेव्हा तोसुद्धा अडखळत एक आयडिया प्रपोज करायची आहे असं सांगतो. कॉन्ट्रॅक्ट संपत आलं असलं तरी आपण हे वाढवून घेऊ आणि मधुभाऊ सुटेपर्यंत घर सोडून जाऊ नका असंही अर्जुन सायलीला सांगतो. केस जिंकेपर्यंत इथेच राहून केसच्या शेवटच्या दिवसांत साथ देण्याचं वचनसुद्धा अर्जुन सायलीकडे मागतो. सायलीसुद्धा साथ द्यायला लगेच तयार होते.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, साक्षी घरात नसताना चैतन्य अर्जुन व सायलीला साक्षी-महीपत विरोधात पुरावे शोधायला घरी बोलावतो. पुरावे शोधत असताना नेमकी साक्षी तिथे येऊन अर्जुन व सायलीला बघते.