मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एकमेकांना सांभाळून घेऊ आणि…”, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दत्तूने बायकोसह शेअर केले रोमँटिक फोटो, म्हणाला, “छान राहू…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 23, 2024 | 6:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra Fame Dattu More wished with special post of his wife on their wedding anniversary

"एकमेकांना सांभाळून घेऊ आणि...", लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दत्तूने बायकोसह शेअर केले रोमँटिक फोटो, म्हणाला, "छान राहू..."

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहत असतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव यांच्यासह पृथ्विक प्रताप, ओंकार राऊत यांमसारखे नवोदीत कलाकारही लोकप्रिय झाले. अशा काही प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे.

दत्तूने आजवर या कार्यक्रमात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आपल्या विविध विनोदी भूमिकांनी कायमच चर्चेत राहणारा दत्तू सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामाची माहिती व काही फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली एक खास पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दत्तूने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर करत बायकोला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

आणखी वाचा – “त्याला बर्गर-पिझ्झा दिला व मला…”, पुणे Porsche अपघात प्रकरणावर केतकी चितळेने मांडलं मत, म्हणाली, “पोलिस लाड पुरवत आहेत अन्…”

“लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असेच छान एकत्र राहु आणि एकमेकांना सांभाळून घेत जाऊ. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत उम्म्म्मम गिफ्ट.?, लवकरच…” असंही गमंतीने म्हटलं आहे. दत्तू व स्वाती यांनी २३ मे २०२३ रोजी गुपचुप पद्धतीने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली होती. कोर्ट मॅरेज पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं. त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.

आणखी वाचा – पुन्हा गाणं शिकण्यासाठी अधिपतीकडे भूवनेश्वरीचा हट्ट, आता पुन्हा आईच्या सांण्यावरुन गाणं शिकणार का?, अक्षराचा काय असणार निर्णय?

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दत्तू आधी प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काम करत होता. पण त्याच्या कलागुणांना ओळखून त्यांना स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी देण्यात आली. आणि दत्तूने त्या संधीच सोनं केलं. त्यामुळे आज महाराष्ट्रात दत्तूच्या अभिनयायाचे व विनोदाचे अनेक चाहते आहेत. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांसह कलाकारांनी त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: dattu moremaharashtrachi hasyajatramarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Big boss ott season three

'बिग बॉस OTT'च्या तिसऱ्या सीझनची घोषणा, सलमान खान नव्हे तर अनिल कपूर करणार सूत्रसंचालन?, व्हिडीओने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.