‘बिग बॉस’ या कार्यक्रमाला देशभरात खूप प्रसिद्धी मिळाली. अनेक कलाकारांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमामुळे अनेकांना एक वेगळी ओळख मिळाली. टेलिव्हिजनवर हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर ओटीटीवर ‘बिग बॉस’ सुरु झाला. दोन्ही सीजनचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खानने केले होते. मात्र आता येणाऱ्या तिसऱ्या सीजनचे सूत्रसंचालन सलमान नाही तर दूसरा अभिनेता करणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. (Big boss ott season three )
‘बिग बॉस’ओटीटी सीजन ३ बाबत अपडेट समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी या शोबद्दल खूप चर्चा सुरु होत्या. तसेच कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शोचे नवीन पोस्टर रिलीज केले होते. तसेच या शोमध्ये कोणाला बघायला आवडेल असेदेखील विचारले होते. याआधी या कार्यक्रमाचा दुसरा सीजन खूप हिट झाला होता. समोर आलेल्या अपडेटनुसार या सीजनचे सूत्रसंचालन अनिल कपूर करणार आहेत. याआधी ‘बिग बॉस’ ओटीटीचे सूत्रसंचालन करण जोहरने केले होते. तसेच दुसऱ्या सीजनचे सूत्रसंचालन सलमान खानने केले होते. नुकताच या सीजनचा पहिला टिझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे.
व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बिग बॉस’ चे हे सीजन पाहून बाकी सर्व विसरून जाल. कारण हा सीजन आहे एकदम झकास”. झकास या शब्दामुळे अनिल कपूर सूत्रसंचालन करतील असा अंदाज सर्वजण बांधत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनिल यांनी मोठी रक्कम आकारल्याचेही सांगितले जात आहे.
अनिल यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते अक्षय कुमारबरोबर ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामध्ये दिसणार होते. मात्र त्यांनी हा चित्रपट सोडल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटासाठी त्यांनी ज्या रक्कमेची मागणी केली ती रक्कम मिळाली नाही त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आता ‘बिग बॉस’ मध्ये अनिल नक्की कसे सूत्रसंचालन करतील. तसेच त्यांचा नवीन अंदाज पाहायला मिळणार आहे.