‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, प्रतिमा प्रियाचा हात झटकून सायलीच्या मागे लपते, अस्मिता प्रतिमाला असं का करत आहेस?, असं विचारते. पुढे रविराज तन्वीला ओळखले नाहीस का असं प्रतिमाला विचारताच सायली, प्रतिमाला सारखे आल्यापासून प्रश्न विचारले जात असल्याने त्यांना आरामाची गरज असल्याचे रविराजला सांगते. विमल सायलीला प्रतिमासाठी खोली तयार ठेवल्याचे सांगते. सायली प्रतिमाला खोलीत घेऊन येताच प्रतिमा थोडी घाबरते पण सायली तिला पुन्हा धीर देते. या घरात फक्त प्रेम मिळणार असून त्यासाठी मनाची तयारी करावी लागेल असा ठाम विश्वास सायली प्रतिमाला देते. (Tharal Tar Mag Serial Update)
दुसरीकडे महीपतला तिजोरीतून पैसे व दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच तो भडकतो आणि साक्षीला बोलावून घेतो आणि त्यांच्या वॉचमनलाही मारहाण करतो. इथे अर्जुन कुसुम ताईला फोन करुन सायली सुखरुप असल्याचे कळवतो आणि सायलीचे अलिबागला ऐकले नाही म्हणून तो सायलीचीसुद्धा माफी मागतो. प्रतिमाच्या पिशवीत नेमकं काय आहे हे सायलीला तो एकदा बघून घ्यायला सांगतो. तुझ्यामुळे आता प्रतिमाला हळूहळू सगळे आठवेल असं अर्जुन सायलीला सांगत सायलीचे आभार मानतो.
पूर्णा आईच्या प्रेमामुळे प्रतिमा परतल्याचे सायली अर्जुनला सांगते. नागराज प्रतिमाला ती इतकी वर्षे कुठे होती हे आठवायला हवे असे सांगताच रविराज ते कधीही आठवू दे पण सध्यातरी ती परत आल्याचा आनंद मोठा असल्याचे सांगतो. आत्ता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झाल्याचे समाधानही रविराज पूर्णा आईकडे व्यक्त करतो. पूर्णा आई प्रतिमाची स्मृती परत येण्याबद्दल बोलताच, मी तिच्याशी बोलून परत आणेन असं तन्वी पूर्णा आईला सांगते. प्रतिमाला तूर्तास आराम हवा असं सायली सांगताच सायलीला वेडंवाकडं बोलून तन्वी तिला फटकारते.
पण पूर्णा आई तन्वीला गप्प करते. हा दिवस सोन्याचा असून साजरा केला पाहिजे असं पूर्णा आई रविराजला सांगते. मालिकेच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली प्रतिमाला अंगाई म्हणत झोपवते आणि हे पाहून घरातले सगळे आनंदी होतात.