बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निक्की तांबोळी अरबाजच्या प्रेमात?, दोघांमध्ये फुलणार प्रेम, इतर सदस्यांनीही उडविली खिल्ली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 30, 2024 | 10:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Updates

निक्की तांबोळी अरबाजच्या प्रेमात?, दोघांमध्ये फुलणार प्रेम, इतर सदस्यांनीही उडविली खिल्ली

‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन अगदी दिमाखात सुरु झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी रितेश भाऊसमोरच स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलवर फिदा झालेली दिसून आली. आता ‘बिग बॉस’च्या घरातील दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येत आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला ‘बिग बॉस’ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो,”बिग बॉस’ आमच्या वहिनींचं तरी ऐका…”. त्यावर अरबाज त्याला म्हणतो,”थांबरे सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू..”. पुढे छोटा पुढारी म्हणतो,”तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही”.

आणखी वाचा – आदित्यचा मोठा अपघात, काढलेलं मंगळसूत्र पारू पुन्हा घालणार का?, काय असेल नियतीचा हा नवा खेळ?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर अरबाज व निक्कीला हसू अनावर होतं. अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो,”प्रेमात असचं असतं ‘बिग बॉस’. छोटा पुढारीमुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात हास्य कल्लोळ होताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचीही कबुली तिने दिली होती.

आणखी वाचा – नेत्राच्या पोटातून अद्वैतला ऐकू आली विचित्र वीणा व किंचाळी, नेत्रा व बाळ वाचणार का?

रितेश भाऊलाही निक्की थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं असं म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, निक्कीला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनमध्ये निक्की व अरबाजची जोडी जमणार का?, याकडे ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष लागून राहील आहे.

Tags: arbaj patelbigg boss marathiBigg Boss Marathi 5 Updatesentertainmentnikki tamboli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
avinash-aishwarya narkar son

Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा लेक पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना, एअरपोर्टवर झाले भावुक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.