शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तन्वीने दिली आत्महत्येची धमकी, अर्जुनने या सगळ्याला पूर्णा आजीला धरलं जबाबदार, सायली मिटवू शकेल का हा अबोला?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

तन्वीने दिली आत्महत्येची धमकी, अर्जुनने या सगळ्याला पूर्णा आजीला धरलं जबाबदार, सायली मिटवू शकेल का हा अबोला?

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुनला प्रियाच लाईव्ह लोकेशन रविराजच्या घराजवळच दाखवत असल्याचं पोलीस सांगतात. इकडे साक्षी प्रचंड घाबरलेली असते. आता मला जन्मठेप होणार नाहीतर फाशी ही भीती तिच्या मनात असते. इकडे सायली तन्वीला शोधण्यासाठी बाहेर पडते. आउट हाऊसमध्ये प्रिया म्हणजेच तन्वी चक्कर येऊन पडलेली असते. तितक्यात सगळे तिथे जमतात. सगळे तन्वीला घरात घेऊन येतात. रविराज सायलीचे आभार मानतो. (Tharal Tar Mag Serial Update)

तन्वी नाटक करत सगळ्यांची माफी मागते. तन्वीने अर्जुनला विलास खुनाच्या कबुलीचा व्हिडीओ न पाठवता फक्त माफी मागण्याचा व्हिडीओ पाठवला असल्याचं नागराजला समजतं दुसऱ्या दिवशी सायली – अर्जुन प्रिया म्हणजेच तन्वीबद्दल बोलत असतात. इकडे प्रिया महीपत- साक्षीच्या घरी येते व ऑर्डर सोडत असते. दुसरीकडे पूर्णा आजी शांत असल्यामुळे सायली – कल्पना पूर्णा आजीला समजावण्याचा प्रयत्न करतात.

आणखी वाचा – भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “हार्दिकने माझ्याकडे बघून…”

अर्जुन खाली येऊन तन्वी आणि अस्मिताच्या वागण्याला पूर्णा आजी जबाबदार आहे असं म्हणतो. सायली-कल्पना अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर अर्जुन काल रात्री तन्वीने आत्महत्या करण्याचा व्हिडीओ पाठवल्याच सांगतो. हे ऐकून पूर्णा आजीला धक्का बसतो. अर्जुन रागात पूर्णा आजी बरोबर बोलणार नसल्याचं सांगत ऑफिसला निघून जातो. अर्जुनच्या बोलण्यामुळे पूर्णा आजीला वाईट वाटतं.

आणखी वाचा – वृषभ, कर्क व कन्या राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार गुडन्यूज, नोकरी-व्यवसायात होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या…

मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, पूर्णा आजी व सायली अर्जुनने पूर्णा आजींशी बोलावं यासाठी प्लान तयार करतात. आता हा प्लॅन यशस्वी होणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल

Tags: entertainmentmarathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Titeeksha Tawde Birthday

तितीक्षा तावडेच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, नवऱ्याने दिलं खास सरप्राईज, आई-वडिलांचीही उपस्थिती अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.