शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तितीक्षा तावडेच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, नवऱ्याने दिलं खास सरप्राईज, आई-वडिलांचीही उपस्थिती अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 5, 2024 | 1:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Birthday

तितीक्षा तावडेच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, नवऱ्याने दिलं खास सरप्राईज, आई-वडिलांचीही उपस्थिती अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. तितीक्षाने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा या भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तितीक्षा तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तितीक्षा तिच्या लग्नामुळे चर्चेत राहिली. अभिनेत्रीने सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. (Titeeksha Tawde Birthday)

नुकताच तितीक्षाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे खास फोटोही तिने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. आता यानंतर तितीक्षाने तिच्या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. घरच्या घरीच तितीक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. “आनंदाने आणि परिपूर्णपणे चौतीस वर्ष पूर्ण. माझ्यावर खूप प्रेम आणि चांगल्या भावनांचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सर्व फक्त सर्वोत्तम आहात”, असं खास कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ व फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – तन्वीने दिली आत्महत्येची धमकी, अर्जुनने या सगळ्याला पूर्णा आजीला धरलं जबाबदार, सायली मिटवू शकेल का हा अबोला?

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं कुटुंबही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळत आहे. तितीक्षाचे आई-बाबाही त्यांच्या घरी आले होते. तसेच तितीक्षाची बहीण खुशबू तावडे आणि भावोजी संग्राम समेळ हेदेखील या सेलिब्रेशनला उपस्थित होते. याशिवाय तितीक्षाच्या सिनेसृष्टीतील मैत्रिणी अनघा अतुल व ऋतुजा बागवेही यावेळी आल्या होत्या. केक कट करत अगदी धुमधडाक्यात व जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आणखी वाचा – किर्लोस्कर बंगल्यात पारू-हरीशच्या केळवणाची जय्यत तयारी, पारूच्या आग्रहाखातर अहिल्यादेवीही जेवणार का?, आलेलं वादळ शांत होईल का?

या शेअर केलेल्या फोटोंवरुन सिद्धार्थने तितीक्षाचा वाढदिवस तिला सरप्राईज देत साजरा केला असल्याचं दिसत आहे. बलून्सचं डेकोरेशन करत रोमँटिक पोज देतानाचा फोटोही त्यांनी शेअर केले आहे. तितीक्षा व सिद्धार्थ ही सिनेसृष्टीतील क्युट जोडीपैकी एक जोडी आहे. बायकोसाठीही सिद्धार्थने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. बायकोच कौतुकही त्याने या पोस्टद्वारे केलं होतं.

Tags: marathi actresstiteeksha tawdeTiteeksha Tawde and Siddharth BodakeTiteeksha Tawde Birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Vaibhav Mangale reached Konkan

लग्नाच्या वाढदिवशी वैभव मांगले बायकोसह कोकणात करत आहेत एन्जॉय, शेअर केला सुंदर व्हिडीओ, म्हणाले, “आमचं लग्न...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.