Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अनेक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत आश्रम केसबाबत मोठा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आश्रम वाचवल्याबद्दल सायली अर्जुन व चैतन्यचे आभार मानत असते. तेव्हा चैतन्य मुद्दाम त्या दोघांना चिडवतो. अर्जुनच सायलीवर प्रेम असल्याचं सत्य तिला कळेल या भीतीने तो चैतन्यला ओरडतो. तर इकडे प्रियाला समजते की, महिपतच्या मूर्खपणामुळे आश्रम केसचा निर्णय त्याच्यावरच उलटला आहे. महीपत विरोधात अर्जुन कोर्टात पुरावे सादर करत आश्रम तोडण्यावर बंदी घालतो. यामुळे अर्थातच महीपतचा राग अनावर झालेला असतो. त्याचा पारा चढलेला असतो तेव्हा प्रिया तिथे पोहोचते.
प्रियादेखील महिपतला खूप काय काय बोलत असते त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढतो. यावेळी महिपत सगळ्यांना सुनावतो की, ‘त्या दिवशी जेव्हा मला फोनची रिंग ऐकू आली तेव्हाच मला संशय आला होता की इथे अर्जुन सुभेदार असू शकतो पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. तेव्हाच जर त्याला पकडलं असतं तर त्याच दिवशी त्याचा खेळ खल्लास केला असता’. तेवढ्यात प्रियाला अस्मिताचा फोन होतो. सुभेदार कुटुंबातील गोष्टी समोर येतील म्हणून प्रिया फोन स्पीकरवर टाकते तेव्हा अस्मिता महीपतची अक्कल काढते. फोन ठेवल्यावर प्रियाही महीपतला दोष देते तेव्हा महीपतचा राग अनावर होतो आणि तो प्रियाच्या कानाखाली मारतो.
आणखी वाचा – Video : लेहेंग्यामध्ये जेनेलिया देशमुखला चालताच येईना, तोल जाताच नवऱ्याने सांभाळलं अन्…; रेड कार्पेटवर फजिती
महिपतने हात उचलल्यामुळे प्रियाचा इगो हर्ट होतो. ती प्रचंड संतापते. महिपतने अपमान केल्यामुळे प्रिया सुद्धा पेटून उठलेली असते आणि ती थेट पोलीस स्टेशनला तक्रार करायला जाते, तेव्हा नागराज तिला कसाबसा थांबवतो. तर इकडे सायली विमलजवळ अर्जुनवरील प्रेमाची कबुली देतो. त्याचवेळी तिथे अर्जुन येतो, मात्र अर्जुन सायलीच हे म्हणणं काही ऐकत नाही तर विमलने सायलीला विचारलेलं असतं की, जर अर्जुनने तुला स्वीकारलं नाही तर तू काय करणार?’.
आणखी वाचा –विमानतळावर ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री व कुशल बद्रिकेची भेट, तोंडभरुन कौतुक करत म्हणाली, “तुझा अभिमान…”
या प्रश्नाचं उत्तर देत सायली म्हणते, ‘मी मधु भाऊ आले की आश्रमात पुन्हा निघून जाईल आणि एवढेच सायलीचा म्हणणं अर्जुन ऐकतो. यावर अर्जुन निराश होतो आणि चैतन्यजवळ जाऊन त्याच्या मनातील भावना व्यक्त करतो. आता पुन्हा एकदा गैरसमजामुळे सायली व अर्जुन दूर जाणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.