‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, कल्पना प्रतापबरोबर बोलताना अर्जुन व सायलीच्या बाळाच्या तयारीला सुरुवात करण्याबाबत बोलत असते. पण प्रताप कल्पनाला त्यांनी आपल्याला काही सांगितल्याशिवाय तू स्वतः काही ठरवू नकोस असं सांगतो. पण कल्पनाला मात्र आजी होण्याची आस लागलेली असते. कल्पना न राहवून सायलीला अर्जुन कोणत्या सेकंड इनिंग बद्दल बोलत होता असाही प्रश्न विचारते. त्यावर सायली मधुभाऊंच्या केसबद्दल बोलत असल्याचं सांगते. सायली आणि अर्जुन सेकंड इंनिंग म्हणजे केसबाबत बोलत असतात मात्र कल्पना स्वतःचा गैरसमज करुन घेते. (Tharal Tar Mag Serial Update)
नातवंडांचे वेध लागल्याने कल्पना सायलीला आपल्या रूममध्ये बोलावून तिला अर्जुनच्या लहानपणीचे कपडे आणि फोटो दाखवते. तेव्हा सायलीच्या लक्षात येत की, कल्पना आजी होण्याची स्वप्न पाहत आहे. सायलीला या स्वप्नाचं फार दडपण येतं. तर एकीकडे अर्जुनचा गोड फोटो पाहून ती खूप खुश होते. सायलीला खुश पाहून कल्पना त्याचा वेगळा अर्थ काढते. लवकरच आपल्या घरात पाळणा हलणार असं तिला सारखं वाटत असतं.
दुसरीकडे रविराज कोर्टात झालेल्या प्रकाराचा विचार करत असतो. तेव्हा तिथे प्रिया व नागराज असतात. साक्षी खोटारडी आहे हे मला माहीत होतं पण आता विलासचा खून तिनेच केला आहे. असा मला दाट संशय वाटत असल्याचं प्रियाला सांगतो. शिवाय विलासचा खून झाला तेव्हा तू एकमेव आयविटनेस होतीस त्यामुळे तू तिथे काय पाहिलं आहेस ते तुला आठवतं आहे का?, असं प्रियाला विचारतो. मात्र प्रिया काहीच आठवत नसल्याचं सांगत दुर्लक्ष करते.
तर इकडे साक्षी महिपतला जाऊन जेलमध्ये भेटते. कोर्टात आपण तोंडावर पडलो हे जेव्हा ती महिपतला सांगते तेव्हा तो तिच्यावर भडकतो. हे सर्व चैतन्यने केलं का असा त्याला संशय येतो. पण साक्षी नाही असं म्हणत त्याने उत्तम प्रकारे माझी बाजू मांडली असं सांगते. साक्षी म्हणते माझ्या फोनला आय लॉक आहे. त्यामुळे चैतन्य माझा फोन उघडूच शकत नाही.यावर महिपत सांगतो की तू लवकरात लवकर मला इथून बाहेर काढ. आता मालिकेच्या पुढील भागात सायली व अर्जुन व्हिडीओ कॉलवर बोलत असतात, तेव्हा सायली कल्पनाला नातवाची आस लागली असल्याचं सांगते. तितक्यात तिथे कल्पना येते तर अर्जुन आईला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजलं का असं विचारतो, आता हे कल्पनाने ऐकलं असेल का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.